US Court Levies $194 Million Penalty on TCS: देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सीला करोडोंचा फटका बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने टाटा समूहाच्या आयटी कंपनीला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमेरिकन आयटी सेवा फर्म DXC (पूर्वी CSC म्हणून ओळखले जाणारे) च्या ट्रेड सिक्रेटचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकन न्यायालयाने TCS ला 194 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1620 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने TCS ला $56 दशलक्ष नुकसान भरपाई आणि $112 दशलक्ष CSC चे एक्जेम्पलरी डॅमेज देण्यास सांगितले आहे.
TCS ने शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ठोठावण्यात आलेला दंड $194.2 दशलक्षपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये $561.5 दशलक्ष नुकसान भरपाई, $112.3 दशलक्षचे एक्जेम्पलरी डॅमेज आणि $25.8 दशलक्ष प्रीजजमेंट इंटरेस्ट यांचा समावेश आहे. भारतीय चलनात दंडाची एकूण रक्कम अंदाजे 1,622 कोटी रुपये आहे.
2018 मध्ये TCS ला US विमा कंपनी Transamerica कडून $2.5 अब्ज किमतीचे काम मिळाले होते. या डीलनुसार, ट्रान्सअमेरिकाच्या 10 दशलक्ष ग्राहकांना (Customers) एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा पुरवल्या जाणार होत्या. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये ही डील रद्द करण्यात आली. मायक्रो इकॉनॉमीच्या परिस्थितीचा हवाला देत ही डील रद्द करण्यात आली.
मात्र, न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे भक्कम कारण असल्याचे भारतीय आयटी कंपनीचे म्हणणे आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात टीसीएस वरच्या न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार आहे. TCS ने सांगितले की, त्यांना 14 जून 2024 रोजी न्यायालयाचा संबंधित आदेश प्राप्त झाला आहे.
टीसीएसच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने मोठा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर विशेष आर्थिक परिणाम होणार नाही. कंपनी आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि न्यायालयाच्या या आदेशामुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची तयारी करत आहे. टीसीएसला आशा आहे की, पुनर्विलोकन याचिका आणि आव्हानानंतर निर्णय आपल्या बाजूने लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.