Free IPL Match Dainik Gomantak
अर्थविश्व

Free IPL Match: मोफत, मोफत... आयपीएलचा प्रत्येक सामना पाहा विनामूल्य; TV, DTH गरज नाही

क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल म्हणजे मोठा उत्सव असतो. त्यामुळे प्रत्येकाला आयपीएल मॅच पाहायची असते

गोमन्तक डिजिटल टीम

Free IPL Match: क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल म्हणजे मोठा उत्सव असतो. त्यामुळे प्रत्येकाला आयपीएल मॅच पाहायची असते, पण कधी कधी तुम्ही घराबाहेर असता तेव्हा लाइव्ह मॅच पाहणे कठीण होते.

पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही एक मार्ग सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्ही IPL मॅच अगदी मोफत पाहू शकाल आणि तुम्हाला पैसे देण्याचीही गरज नाही.

Jio Cinema वर तुम्ही कोणताही आयपीएल सामना अगदी मोफत पाहू शकता. तुम्हीच नाही तर अनेक लोक इथून मॅच बघत आहेत आणि त्यांना वेगळे पैसे देण्याचीही गरज नाही. सामन्याचे थेट प्रक्षेपण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल सामना डिस्ने + हॉटस्टारवर पूर्णपणे विनामूल्य प्रसारित केला जात होता.

जिओने आयपीएल मॅच पूर्णपणे मोफत प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच अनेकजण त्याचा वापरही करत आहेत. सर्वप्रथम, तुम्हाला मोबाईलमध्ये Jio Cinema App डाउनलोड करावे लागेल आणि तुम्ही त्यात गेल्यावर तुम्हाला सर्व सामन्यांची यादी दिसेल.

जिओ सिनेमामध्ये तुम्हाला इतर अनेक चित्रपट पाहण्याची संधी दिली जाते. लॉगिन केल्यानंतर तुम्ही येथून कोणताही व्हिडिओ ऑनलाइन पाहू शकता. तुमच्याकडे फक्त तुमच्या मोबाईलमध्ये डेटा असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाइन सामना पाहता तेव्हा डेटा संपणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

पण तुम्हाला आयपीएल मॅच पाहण्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. यामुळेच अनेक लोक हे अॅप नेहमी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT