Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Train: आंध्र प्रदेशात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, 19 जानेवारीला PM मोदी...

Vande Bharat Train: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बुधवारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Train: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बुधवारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली. देखभाल दुरुस्तीदरम्यान ही दगडफेक झाली. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. याआधीही अनेकवेळा इतर राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला दगडफेक करुन लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये काही लोकांना अटकही करण्यात आली होती.

तसेच, राममूर्ती पंतुलुपेटा-कंचरापालमजवळ झालेल्या घटनेत वंदे भारत ट्रेनच्या डब्याची विंडशील्ड तुटली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या सूचनेवरुन तपास सुरु करण्यात आला आहे. ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत ट्रेन विशाखापट्टणम (Visakhapatnam) रेल्वे स्थानकावरुन मारिपालेम येथील कोच देखभाल केंद्राकडे जात असताना देखभाल प्रक्रियेदरम्यान दगडफेक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरुन पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ते सिकंदराबाद ते विशाखापट्टणम हे अंतर अंदाजे आठ तासात कापेल. ही ट्रेन वारंगल, खम्मम, विजयवाडा आणि राजमुंद्री येथे थांबेल.

शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 19 जानेवारी रोजी तेलंगणाला भेट देतील आणि हैदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान वंदे भारत ट्रेन देशाला समर्पित करतील. 19 जानेवारी रोजी पंतप्रधान सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरुन सकाळी 10 वाजता देशातील आठव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या 699 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT