Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Train: वंदे भारताबाबत आनंदाची बातमी, प्रवाशांना लवकरच मिळणार ही मोठी सुविधा

Vande Bharat train: ट्रेन इकोसिस्टममध्ये वंदे भारत एक्सप्रेस अव्वल स्थानावर आहे. सध्या वंदे भारत गाड्या देशभरात 4 मार्गांवर धावत आहेत.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express train: ट्रेन इकोसिस्टममध्ये वंदे भारत एक्सप्रेस अव्वल स्थानावर आहे. सध्या वंदे भारत गाड्या देशभरात 4 मार्गांवर धावत आहेत. आगामी काळात या ट्रेनची संख्या वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच सांगितले होते की, सरकार 2025 पर्यंत देशात 475 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा विचार करत आहे.

यासोबतच रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत ट्रेनसाठी 200 नवीन रेक बनवण्यासाठी निविदा जारी केली आहे. अधिकृत माहितीनुसार, एकूण निविदा खर्च सुमारे 26,000 कोटी रुपये आहे. एवढेच नव्हे तर हा प्रकल्प अवघ्या 30 महिन्यांत पूर्ण करावा लागणार असल्याचेही बोलले जात आहे.

स्लीपर कोचची भेट मिळेल

BHEL, BML, Medha, RVNL आणि Alstom India या पाच मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे. विशेष म्हणजे, वंदे भारतचे हे 200 रेक फक्त स्लीपर क्लाससाठी डिझाइन केले जातील. तसेच, ट्रेन अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह बनविली जाऊ शकते, ट्रेनच्या (Train) मागील आवृत्तीपेक्षा 2-3 टन हलकी असू शकते.

सुविधांमध्ये वाढ होईल

या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा असलेले स्लीपर क्लासचे डबे असतील. प्रत्येक डब्यात प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट देणारे एलईडी स्क्रीन असेल. नव्याने डिझाइन केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये फोटो कॅटेलिटिक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली असेल, जी हवा शुद्धीकरणासाठी बसवली जाईल.

प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी या गाड्यांमध्ये स्वयंचलित फायर सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) आणि जीपीएस प्रणाली देखील असतील. विशेष म्हणजे, वंदे भारत एक्सप्रेस गाड्या विमानासारखा प्रवास अनुभव देतात. सर्व ट्रेन्स अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी सुसज्ज आहेत. देशातील रेल्वे विकास प्रकल्पांसाठी या गाड्या गेम चेंजर असल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT