Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: वंदे भारत ट्रेनबाबत खूशखबर, आता तिकीट होणार स्वस्त; रेल्वेने बनवली खास योजना

Vande Bharat Train: भारतीय रेल्वे (Indian Railways Latest News) वंदे भारत संदर्भात एक मोठी योजना बनवत आहे.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Train: भारतीय रेल्वे (Indian Railways Latest News) वंदे भारत संदर्भात एक मोठी योजना बनवत आहे. देशभरात या ट्रेनचे जाळे वाढवण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. सध्या देशात 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. प्रवास स्वस्त व्हावा यासाठी सरकार सध्या वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच बसवण्याचा विचार करत आहे. स्लीपर कोचमुळे रेल्वेचे तिकीटही स्वस्त होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

वेग 200 किमी प्रति तास असू शकतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 200 किमी असू शकतो. या ट्रेनमधील (Train) स्लीपर कोच अॅल्युमिनियमचा वापर करुन बनवला जात आहे.

ट्रेन किती वेगाने धावू शकेल?

वृत्तसंस्थेनुसार, 4 देशी कंपन्यांसह विदेशी कंपन्याही या गाड्यांच्या बांधणीसाठी पुढे आल्या आहेत. पहिल्या 200 वंदे भारत ट्रेनमध्ये शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे आसनव्यवस्था असेल. सध्या या गाड्या ताशी 180 किमी वेगाने धावू शकतील.

रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल

रेल्वेने सांगितले आहे की, रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेचा विचार करुन ताशी 130 किमी वेगाने धावण्याची परवानगी मिळेल. यासोबतच चेअर कार ट्रेनही स्टीलच्या बनवल्या जातील.

दुसऱ्या टप्प्यात 200 गाड्या करण्यात येणार आहेत

रेल्वेने सांगितले आहे की, दुसऱ्या टप्प्यात 200 स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती करणार आहे. या गाड्या बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅकबाबतही काम सुरु आहे. यासोबतच सिग्नल आणि पुलाचेही काम सुरु आहे. दिल्ली-कोलकाता (Kolkata) आणि दिल्ली-मुंबई दरम्यान हे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT