स्मार्टफोन प्रेमींसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत खास ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच टेक मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या महिन्यात एकामागून एक तब्बल ७ जबरदस्त स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. यामध्ये सॅमसंगची प्रीमियम 'S' सिरीज आणि ॲपलचा बजेट फ्रेंडली 'iPhone 17e' यांचा समावेश असल्याने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. फ्लॅगशिप फीचर्सपासून ते बजेट सेगमेंटपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होणार असल्याने नवीन फोन घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले बजेट आतापासूनच तयार ठेवणे फायद्याचे ठरेल.
सॅमसंग २५ फेब्रुवारी रोजी आपल्या 'Unpacked' इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षित Galaxy S26 सिरीज लाँच करणार आहे. यामध्ये 'Snapdragon 8 Elite Gen 5' चिपसेट आणि प्रगत कॅमेरा फीचर्स पाहायला मिळतील.
दुसरीकडे, विवो आपली V70 आणि V70 Elite ही सिरीज Zeiss ऑप्टिक्स आणि AI फीचर्ससह उतरवणार आहे, ज्यामुळे फोटोग्राफी शौकिनांची चांदी होणार आहे.
मध्यमवर्गीयांसाठी ओप्पो आपला K14x 5G (१० फेब्रुवारी) आणि सॅमसंग Galaxy F70e 5G (९ फेब्रुवारी) हे फोन्स लाँच करत आहेत. विशेष म्हणजे सॅमसंगच्या या बजेट फोनमध्ये ६,०००mAh ची मोठी बॅटरी आणि लेदर बॅक पॅनल मिळणार आहे.
तसेच, परफॉर्मन्सच्या बाबतीत आयकू (iQOO) आपला iQOO 15R हा फोन ७,६००mAh बॅटरीसह २४ फेब्रुवारीला लाँच करणार आहे, जो थेट वनप्लस आणि आयफोनला टक्कर देईल.
सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे iPhone 17e ची. ॲपल या महिन्यात आपला स्वस्त आयफोन लाँच करण्याची शक्यता असून यात A19 चिपसेट पाहायला मिळेल.
तसेच मोटोरोला देखील आपला Edge 70 Fusion हा १४४Hz रिफ्रेश रेट असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. एकूणच, फेब्रुवारी महिना तंत्रज्ञान क्षेत्रातील 'सुपर संडे' सारखा असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.