भारताच्या ऑटोमोबाईल बाजारात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातील चार प्रमुख कार उत्पादक कंपन्या – मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा लवकरच आपल्या नवीन कॉम्पॅक्ट कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
या वर्षाच्या अखेरीस एकूण चार नव्या कार्स भारतीय बाजारात दाखल होणार असून त्यामध्ये तीन कॉम्पॅक्ट SUV आणि एक हॅचबॅक कार समाविष्ट आहे.
विशेष म्हणजे या गाड्या पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना त्यांची गरज आणि पसंतीनुसार इंधन पर्याय निवडता येणार आहे.
महिंद्रा XUV 3XO EV
महिंद्रा लवकरच त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV 3XO चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे. ही कार महिंद्राच्या इतर इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV400 पेक्षा लहान असेल आणि टाटा पंच ईव्हीशी थेट स्पर्धा करेल. ही कार एका चार्जमध्ये सुमारे ४०० ते ४५० किलोमीटरची रेंज देऊ शकते.
टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट
टाटा अल्ट्रोजचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. नवीन डिझाइन, नवीन एलईडी हेडलाइट, कनेक्टेड एलईडी टेललाइट आणि फ्लश-प्रकारच्या दरवाजाच्या हँडलसह ही कार बाजारात येऊ शकते. यात दोन मोठ्या एचडी स्क्रीन, अॅम्बियंट लाइटिंग, नवीन सीट्स आणि एअर प्युरिफायर सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिड
मारुती सुझुकी आता त्यांच्या लोकप्रिय कार फ्रॉन्क्समध्ये हायब्रिड तंत्रज्ञान आणण्याची योजना आखत आहे. यामध्ये ग्राहकांना १.२ लिटर पेट्रोल इंजिनसह एक सौम्य हायब्रिड सिस्टम मिळेल, जे मायलेज वाढविण्यास मदत करू शकते.
एसयूव्ही व्हेन्यू
ह्युंदाईची प्रसिद्ध एसयूव्ही व्हेन्यू आता पूर्णपणे नवीन अवतारात बाजारात येणार आहे. नवीन डिझाइन, सुधारित इंटीरियर आणि नवीनतम वैशिष्ट्यांसह, ही कार या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते. इंजिनमध्ये फारसे बदल होणार नाहीत. परंतु तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये अपडेट्स दिसू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.