Ration Card New Rule Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card New Rule: 14 कोटी रेशन कार्डधारकांसाठी खूशखबर! आता रेशनसोबत मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; सरकारचा मोठा निर्णय

UP Ration card holders free treatment up to ₹5 lakh: उत्तर प्रदेशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने राज्यातील पात्र कुटुंबांना मोफत रेशनसोबतच उत्तम आरोग्य सुरक्षा देण्याचा एक निर्णय घेतला.

Manish Jadhav

UP Ration Card 5 Lakh Health Insurance: उत्तर प्रदेशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने राज्यातील पात्र कुटुंबांना मोफत रेशनसोबतच उत्तम आरोग्य सुरक्षा देण्याचा मोठा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील सर्व रेशन कार्डधारकांना 'प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजने'शी जोडण्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. सरकारच्या या मोठ्या पावलामुळे राज्यातील सुमारे 14.61 कोटी नागरिकांना थेट आरोग्य विम्याचा आणि मोफत उपचारांचा फायदा मिळणार आहे.

सध्या उत्तर प्रदेशात लाल आणि पांढऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या रेशन कार्डांची (Ration Card) एकूण संख्या 3.63 कोटींपेक्षा जास्त असून, त्या अंतर्गत 14.61 कोटींहून अधिक नागरिक नोंदणीकृत आहेत. ही नवीन व्यवस्था लागू होताच हे सर्व रेशन कार्डधारक आपोआप आयुष्मान कार्डसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना आयुष्मान भारत योजनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आणि कॅशलेस उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन काही तांत्रिक बाबींवर काम करत आहे. ज्या कुटुंबांमधील सदस्य सरकारी नोकरीत आहेत आणि आधीच त्यांच्या विभागाकडून कोणत्याही आरोग्य विमा किंवा कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेच्या व्याप्तीतून वगळले जाऊ शकते. सर्व रेशन कार्डधारकांचा आयुष्मान योजनेत समावेश केल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

सध्या यूपी सरकार आयुष्मान योजनेवर दरवर्षी सुमारे 6000 ते 9000 कोटी रुपये खर्च करते, जो आता वाढून वार्षिक 15000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आगामी पूरक अंदाजपत्रकात यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच या सुविधेच्या औपचारिक प्रारंभाची तारीख जाहीर केली जाणार असून, यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांवरील वैद्यकीय खर्चाचा ताण पूर्णपणे हलका होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Threat: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

UN General Assembly: 'कारगिलमध्ये स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह नाकारले', UNच्या मंचावर भारतानं घेतला पाकड्यांचा समाचार; धार्मिक स्वातंत्र्यावरुन थेट बाण VIDEO

Regional Development Plan: प्रत्यक्ष पाहणीपेक्षा विकास आराखड्याला प्राधान्य! हायकोर्टाचे आसगाव पंचायतीला बांधकाम परवाना देण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT