Highest FD Interest Rates Dainik Gomantak
अर्थविश्व

Highest FD Interest Rates: FD धारकांसाठी आनंदाची बातमी, PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा 'या' बँका देतायेत जास्त व्याजदर

Highest FD Interest Rates: चांगला व्याजदर पाहून तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Highest FD Interest Rates: चांगला व्याजदर पाहून तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. काही प्रायव्हेट बँकांकडून एफडीवर (FD) बंपर व्याज दिले जात आहे. रेपो रेट 6.5 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर अनेक बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत.

युनिटी आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ग्राहकांना (Customers) 9 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. या दोन्ही स्मॉल फायनान्स बँकांकडून काही मुदतीच्या FD वरील गुंतवणूक PPF, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या गुंतवणूक (Investment) योजनांपेक्षा खूप जास्त आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

दरम्यान, युनिटी स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना 4.5% ते 9% पर्यंत व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना बँक वार्षिक 9.5% व्याज देत आहे. हे व्याज एफडीवर 1001 दिवसांच्या कालावधीसह दिले जात आहे. परंतु सामान्य गुंतवणूकदारांसाठी हे व्याज 9% आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर बँकेकडून 4.5% ते 9.5% पर्यंत व्याज मिळते.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 4% ते 9.1% पर्यंत व्याज देत आहे. बँकेकडून, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.5% ते 9.6% पर्यंत व्याज मिळत आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.1% व्याजदर दिला जातो. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने सांगितले की, नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या ठेवींवर 9.10% व्याजदर मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 0.5 टक्के जास्त म्हणजे 9.60 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT