Union Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2023: अर्थसंकल्पात वृद्धांसाठी मोठी घोषणा, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी...!

Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसोबतच वृद्धांसाठीही मोठी घोषणा केली.

Manish Jadhav

Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसोबतच वृद्धांसाठीही मोठी घोषणा केली आहे. सीतारामन म्हणाल्या की, 'ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.'

यासोबतच अर्थमंत्र्यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना बचतीकडे आकर्षित करण्यासाठी नवीन बचत योजना सुरु करण्यात आली आहे. महिला सन्मान बचत योजना सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या दोन वर्षांच्या योजनेत महिलांना 2 लाख रुपयांच्या बचतीवर 7.5% व्याज मिळेल.

नोकरदारांना मोठा दिलासा

त्याचवेळी, या अर्थसंकल्पात (Budget), आयकर स्लॅबची संख्या सहा वरुन पाच करण्यात आली, ज्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला. 3 ते 6 लाख रुपयांवर 5%, 6 ते 9 लाख रुपयांवर 10%, 9 लाख ते 12 लाख रुपयांवर 15%, 12 लाख ते 15 लाख रुपयांवर 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% द्यावे लागतील.

इतर काही घोषणा

740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी पुढील 3 वर्षांत 38,000 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान प्रणाम योजना सुरु करण्यात येणार आहे. गोवर्धन योजनेंतर्गत 500 नवीन संयंत्रे उभारण्यात येणार आहेत

ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात 20,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

पंतप्रधान प्रणाम योजना सुरु होणार आहे. पीएम प्रणाम योजना सेंद्रिय शेतीसाठी असेल.

गोवर्धन योजनेंतर्गत 500 प्लँट उभारण्यात येणार आहेत.

मागासवर्गीय तरुणांसाठी पीएम विश्वकर्मा कौशल योजना ही विशेष योजना सुरु करण्यात आली आहे.

PMKVY 4.0 सुरु होईल. युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल. 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स उघडली जातील.

एमएसएमई क्षेत्राला विशेष पॅकेज दिले जाईल.

व्यवसायात पॅन हे ओळखपत्र म्हणून मानले जाईल.

पीएमबीपीटीजी डेव्हलपमेंट मिशन विशेषत: आदिवासी गटांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, पीबीटीजी वस्त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सुरु करण्यात येईल. पुढील 3 वर्षात ही योजना लागू करण्यासाठी 15,000 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील

पंतप्रधान आवास योजनेचा निधी वाढला, गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा निधी

शेतकऱ्यांना (Farmer) एक वर्षासाठी कर्जमाफी मिळणार आहे.

50 नवीन विमानतळे सुरु होणार आहेत.

रेल्वेवर 2.4 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

आता महापालिका आपले बाँड आणू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT