Anurag Thakur Dainik Gomanta
अर्थविश्व

महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 75 लाख मोफत LPG कनेक्शन मिळणार!

Ujjwala Yojana: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला आहे.

Manish Jadhav

Ujjwala Yojana: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने एलपीजीच्या किमती कमी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला.

या कपातीमुळे गॅसचे दर 9 वर्षांपूर्वीच्या दरावर पोहोचले. यापूर्वी एलपीजी गॅसची किंमत 1100 रुपये होती, मात्र 200 रुपयांची कपात झाल्यानंतर आता गॅस 900 रुपयांत मिळत आहे. या सगळ्यात केंद्र सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, आणखी 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जातील. पुढील 3 वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना हे एलपीजी कनेक्शन दिले जाईल.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली आहे

पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधन आणि ओणमच्या मुहुर्तावर एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 900 रुपयांमध्येही 200 रुपये कमी द्यावे लागतील. उज्ज्वला योजनेच्या यशाचे कौतुक अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, या योजनेमुळे महिलांच्या (Women) जीवनात अमूलाग्र बदल झाले आहेत.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

गॅसच्या दरात कपात केल्यानंतर उज्ज्वला योजनेचा सर्वाधिक फायदा लाभार्थ्यांना होणार आहे. याआधी त्यांना गॅसवर 200 रुपये सबसिडी मिळायची पण आता 400 रुपये सबसिडी (Subsidy) मिळणार आहे. 75 लाख एलपीजीच्या मोफत कनेक्शनच्या सरकारच्या घोषणेनंतर, देशातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटींवरुन 10.35 कोटी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT