बाईक प्रेमींसाठी TVS ने TVS Apache RR 310 भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करुन मोठा धमाका केला आहे. कंपनीने या फुली-फेयर्ड सुपरस्पोर्ट बाईकमध्ये अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. या बाईकमध्ये 8-स्पोक अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. ही धमाकेदार बाईक ब्लू कलरच्या स्कीमसह अपडेट करण्यात आली आहे. चला तर मग या नवीन Apache RR 310 ची किंमत आणि त्यात काय खास आहे ते जाणून घेऊया...
दरम्यान, नवीन बदलांसह नवीन Apache RR 310 ची किंमत थोडी वाढवण्यात आली आहे. या बाईकची एक्स-शोरुम किंमत आता 2,77,999 रुपयांपासून सुरु होऊन 2,99,999 रुपयांपर्यंत जाते. त्याचे नवीन बेस मॉडेल गेल्या वर्षीच्या मॉडेलपेक्षा 4,999 रुपयांनी महाग झाले आहे.
नवीन अपाचे आरआर 310 मध्ये अपडेटेड 312 सीसी सिंगल-सिलेंडर (ओबीडी-2बी कंप्लायंट) इंजिन आहे. हे इंजिन 38 पीएस पॉवर आणि 29 एनएम टॉर्क जनरेट करते. ते 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकमध्ये आता 8-स्पोक 17-इंच अलॉय व्हील्स आणि रेस बाईकपासून (Bikes) प्रेरणा घेऊन नवीन सेपांग ब्लू रंगसंगती देखील देण्यात आली आहे. बाईकला कॉर्नरिंग इंजिन ब्रेकिंग कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी मल्टी-लँग्वेज सपोर्ट आणि सीक्वेंशियल टर्न इंडिकेटर मिळतात.
दुसरीकडे मात्र, या नवीन Apache RR 310 च्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच यात हेडलॅम्प एलईडी टेल लाईट्स दिसत आहेत. बाईकमध्ये अजूनही विंगलेट्स आणि स्प्लिट-सीट सेटअप आहे. या बाईकमध्ये राईड मोड्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत. यात इन्व्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. समोर 300 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 240 मिमी डिस्क ब्रेक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.