Elon Musk Tesla in India Dainik Gomantak
अर्थविश्व

Tesla in India: टेस्लाचे उच्च अधिकारी येणार भारत भेटीला, PMO सह सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे उच्च अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे उच्च अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय (PMO) आणि भारत सरकारच्या इतर प्रमुख प्रतिनिधींचीही भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ब्लूमबर्ग आणि रॉयटर्स यांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

टेस्ला अधिकार्‍यांच्या या भेटीचा उद्देश भारतात पुरवठा साखळी वाढवणे हा असल्याचे मानले जात आहे. ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांची कंपनी टेस्ला चीनमधून विविधीकरण करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून भारतात केंद्र उभारण्याचा विचार करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे अधिकारी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत त्यांच्या कारचे पार्स्ट्स भारतात तयार करण्याच्या शक्यतांचाही विचार करतील.

टेस्लाने अधिक आयात शुल्काचे कारण देत सुमारे एक वर्षापूर्वी भारतात आपला व्यवसाय वाढवण्याची योजना थांबवली होती. कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनीही त्यावेळी भारतात आयात शुल्क जगात सर्वाधिक असल्याचे विधान केले होते.

भारत सरकारने आयात शुल्क कमी करावे आणि अमेरिका आणि चीनमध्ये बनवलेल्या कार आयात करण्यास परवानगी द्यावी असेही टेस्लाने म्हटले होते. कंपनी भारतात उत्पादन करण्यास तयार असेल तरच आयात शुल्कात सूट देण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी सरकारची इच्छा होती.

टेस्लाचा भारतात विस्तार करण्याची योजना याच मुद्द्यामुळे रखडल्याचे मानले जाते. पण आता कंपनी पुन्हा एकदा भारतात आपला व्यवसाय वाढवण्यात स्वारस्य दाखवत आहे.

टेस्लाचा विविध कारणांमुळे भारतात प्रवेश झाला नाही, तर मर्सिडीज-बेंझ एजी सारखे जागतिक कंपन्या स्थानिक पातळीवर कार विकण्याच्या तयारीत आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या स्पर्धा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT