Car Dainik Gomantak
अर्थविश्व

देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 3 कार, देतात कमी किंमतीत उत्तम मायलेज

जून महिन्यात लोकांना सर्वात जास्त आवडलेल्या कार तुम्हाला माहित आहेत का?

दैनिक गोमन्तक

देशातील ऑटो क्षेत्रातील कार निर्मात्यांनी जून 2022 मध्ये त्यांच्या कारच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत, त्यानुसार मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सच्या कारला ग्राहकांनी जून महिन्यात सर्वाधिक पसंती दिली आहे. तुम्‍ही नवीन कार खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, जून 2022 मध्‍ये सर्वाधिक विकल्‍या जाणा-या टॉप 3 कार तुम्हाला माहित आहेत का? (Best Selling Cars in India)

मारुती वॅगनआर (Maruti WagonR): मारुती वॅगनआर ही हॅचबॅक सेगमेंटसह कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जून महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत ही कार पहिली पसंती ठरली आहे. कंपनीने जून 2022 मध्ये या कारचे 19,190 युनिट्स विकले आहेत तर जून 2021 मध्ये कंपनीने या कारच्या 19,447 युनिट्सची विक्री केली आहे. या 1 टक्क्यांच्या घसरणीनंतरही ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift): मारुती सुझुकी स्विफ्ट ही स्पोर्टी डिझाईन असलेली प्रीमियम हॅचबॅक कार आहे जी डिझाइन, मायलेज आणि किंमतीमुळे पसंत केली जाते. ही कार जून 2022 मध्ये देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे. कंपनीने जून 2022 मध्ये या मारुती स्विफ्टच्या 16,213 युनिट्सची विक्री केली आहे तर जून 2021 मध्ये कंपनीने या कारच्या 17,727 युनिट्सची विक्री केली आहे. विक्रीत 9 टक्क्यांनी घट होऊनही ही कार देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno): मारुती सुझुकी बलेनो ही एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे जी कंपनीने अलीकडेच नवीन स्वरूपात लॉन्च केली आहे. मारुती सुझुकीने जून 2022 मध्ये या बलेनो कारच्या 16,103 युनिट्सची विक्री केली आहे, तर जून 2021 मध्ये, कंपनी या हॅचबॅकच्या केवळ 14,701 युनिट्सची विक्री करू शकली. नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च केल्यानंतर, कंपनीने एका वर्षात या कारच्या विक्रीत 10 टक्के वाढ केली आहे, ज्यामुळे ही कार देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT