Cyber Insurance  Dainik Gomantak
अर्थविश्व

Cyber Insurance काळाची गरज, तुम्हीही पॉलिसी काढायच्या विचारात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

देशात डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. तेव्हा सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर विमा उपयुक्त आहे

दैनिक गोमन्तक

देशात डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यासोबतच आर्थिक आणि वैयक्तिक माहिती लीक होण्याच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. सायबर गुन्हेगार अनेक मार्गांनी तुमचा मौल्यवान डेटा, ओळख आणि पैसा चोरू शकतात. या प्रकारचे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर विमा खूप उपयुक्त आहे. सायबर इन्शुरन्समध्ये, पॉलिसी धारकाला विविध प्रकारचे सायबर गुन्हे आणि फसवणुकीपासून संरक्षण दिले जाते.(Cyber Insurance)

सायबर विम्यामध्ये सायबर फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याव्यतिरिक्त तृतीय पक्षाच्या दाव्यांमुळे उद्भवलेल्या आर्थिक दायित्वांचा समावेश होतो. जर कोणी फिशिंग आणि ईमेल स्पूफिंगचा बळी बनून तुमचे पैसे चोरले, तर विमा कंपनी तुम्हाला या सायबर क्राईममुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करते. इतकेच नाही तर, सायबर हल्ल्याचा बळी झाल्यानंतर मानसिक आघात, तणाव किंवा अस्वस्थतेमुळे विमाधारकाला वैद्यकीय समुपदेशन करावे लागल्यास झालेल्या खर्चाची भरपाईही सायबर विमा योजना करते.

सायबर विमा घेताना विमा पॉलिसी नीट समजून घेतली पाहिजे. पॉलिसीमधून तुम्हाला कोणते संरक्षण मिळेल हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. सायबर विमा पॉलिसी 10 ते 15 प्रकारच्या सायबर धोक्यांपासून संरक्षण देतात. तुमची सायबर सुरक्षा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन विमा संरक्षणाची मर्यादा निवडली पाहिजे. जर तुम्ही खूप ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्ही उच्च मर्यादा असलेल्या पॉलिसीसाठी जावे.

अनेक कंपन्या डिडक्टिबल अटी लादतात. यामध्ये पॉलिसीधारकाला आधी स्वतःच्या खिशातून नुकसान भरपाई द्यावी लागते आणि त्यानंतर विमा कंपन्या पैसे देतात. बर्‍याच कंपन्यांचे प्रीमियम कमी असतात, परंतु डिडक्टिबल जास्त असते. सायबर इन्शुरन्स घेताना हे लक्षात ठेवा की तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागला तरी डिडक्टिबल कमी ठेवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT