this feature of google map tell the live location of the train know how to activate it  Dainik Gomantak
अर्थविश्व

आता ट्रेन चुकणार नाही, गुगल मॅपचे फीचर सांगेल लाईव्ह लोकेशन

गुगल मॅपचे हे वैशिष्ट्य देशभरातील सर्व शहरांमध्ये काम करणार

दैनिक गोमन्तक

गुगलने ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही ट्रेनचे लाईव्ह लोकेशन जाणून घेऊ शकाल. यासोबतच स्टेशनवरील प्लॅटफॉर्म बदलल्यानंतरही तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. अनेक वेळा लोकांना ट्रेनबद्दल अचूक माहिती न मिळाल्यामुळे ट्रेन चुकते. पण गुगलच्या लाइव्ह ट्रेन लोकेशन फीचरच्या मदतीने आता प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही.

गुगल मॅपच्या या फीचरचा वापरकर्त्यांना चांगलाच उपयोग होऊ शकतो. या अॅपच्या माध्यमातून आता युजर्सला ट्रेनची येण्याची वेळ, वेळापत्रक, ट्रेनच्या (Train) विलंबाची माहिती आणि इतर अनेक माहिती अॅपवर मिळू शकणार आहे.

देशभरात काम करेल -

गुगल (Google) मॅपचे हे वैशिष्ट्य देशभरातील सर्व शहरांमध्ये काम करेल. याच्या मदतीने तुम्ही ट्रेन नंबरच्या मदतीने थेट लोकेशन शोधू शकाल. याशिवाय स्टेशनवर प्लॅटफॉर्म बदलण्याबाबतही माहिती सहज मिळेल.

यासाठी आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप्स अॅप ओपन करावे लागेल.

यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला जिथे जायचे आहे ते ठिकाण टाकावे लागेल.

यानंतर ट्रेन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला त्या मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांची नावे दिसतील.

आता थेट ट्रेन स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ट्रेनच्या नावावर क्लिक करावे लागेल.

येथे वापरकर्त्यांना त्या मार्गावर येणाऱ्या सर्व स्थानकांची नावे देखील पाहता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT