jobs Dainik Gomantak
अर्थविश्व

'या' आयटी कंपन्या करणार मोठी नोकरभरती, भरघोस मिळणार वेतनवाढ

दैनिक गोमन्तक

कोरोना प्रादुर्भावामुळे (Covid 19) देशात 2020 मध्ये अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला, त्यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच अनेकजणांच्या वेतनामध्ये मोठी कपातही झाली. मात्र मागील दीड वर्षानंतर काही क्षेत्रे पुन्हा एकदा सावरताना दिसू लागली आहेत. विशेषत: पुन्हा एकदा आयटी क्षेत्रामध्ये (IT sector) मोठ्या नोकऱ्यांची संधी निर्माण होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात या आयटी कंपन्या नोकरभरती करत आहेत. शिवाय आयटी कंपन्यांमध्ये असणाऱ्यांना मोठी वेतनवाढदेखील देण्यात येत आहे. कोरोना काळात तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्व लक्षात घेता अनेक बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये (IT jobs) नव्याने नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यात मोठ्याप्रमाणात नोकरभरती सुरु झाली आहे.

आयटी कंपन्या देतायेत मोठ्या पगाराच्या नोकऱ्या

या काळात नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे, असे नाही तर या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्याही देत आहेत. त्यामुळे मोठ्या पगाराच्या या ऑफरमुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षादेखील मोठ्याप्रमाणात वाढू लागल्या आहेत. कौशल्याप्राप्त अभियंत्याला कंपन्या 70 ते 120 टक्क्यांपर्यंत वेतन वाढ देत आहेत. ही वेतनवाढ अर्थात जास्त आहे. गेल्या वर्षापर्यंत याच कर्मचाऱ्यांना केवळ 20 ते 30 टक्के वेतनवाढ मिळत होती. त्याचबरोबर आयटी क्षेत्रामध्ये नावाजलेल्या कंपन्यामध्ये त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेसने अर्थात टीसीएसने अलिकडेच जाहीर केले ते महिला कर्मचाऱ्यांसाठीही मोठी नोकरभरती करत आहेत. शिवाय ज्या महिलांच्या करियरमध्ये बऱ्याच काळापासून गॅप पडलेला असेल अशा महिलांसाठी ही मोठी संधी आहे. त्याचबरोबर कौशल्याप्राप्त असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना नव्याने नोकरीची संधी देण्यासाठी कंपनीने हे पाऊले उचलली आहेत.

सुवर्णसंधी

दरम्यान, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस (TCS) आणि आयटी क्षेत्रामध्ये इतर कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करत आहेत. याचाच अर्थ आयटी क्षेत्राने पुन्हा एकदा गती पकडली. त्याचबरोबर एकूण वेतनाची रक्कम यावर्षी 1.6 ते 1.7 अब्ज डॉलरवर जाणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये संधी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी बदलायची आहे, त्यांनादेखील मोठ्याप्रमाणात संधी आहेत. देशात बंगळूरु, हैदराबाद, चेन्नईसारख्या शहरांमध्ये जिथे मोठ्याप्रमाणात आयटी क्षेत्राचे जाळे आहे, तिथे या संधी उपलब्ध आहेत. आयटी क्षेत्राबरोबर रियलइस्टेटमध्ये देखील या काळात पुन्हा एकदा तेजी आली आहे. कोरोना काळात अनेक क्षेत्रांची गाडी रुळावरुन घसरलेली असताना आयटीक्षेत्रातील तेजीमुळे युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा नव्याने संधी निर्माण झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमानदेखील पुन्हा एकदा उंचावण्यास मदत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT