iPhone|Apple Dainik Gomantak
अर्थविश्व

Apple यूजर्सना धोका? भारत सरकारचा इशारा, फटका बण्यापूर्वी करा 'हे' काम

कर्नेल हा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा महत्त्वाचा भाग असतो, तर WebKit हे Apple Safari ब्राउझरमागील प्रमुख तंत्रज्ञान आहे.

Ashutosh Masgaunde

The Indian Computer Emergency Response Team of the Ministry of Information Technology issued a security alert for iPhone users in India:

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने भारतातील आयफोन यूजर्ससाठी सुरक्षेचा इशारा जारी केला आहे. या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास यूजर्सना हॅकिंगचा धोका उद्भवू शकतो. अशा स्थितीत यूजर्सला फोन लगेच अपडेट करावा लागेल.

आपल्या अधिकृत वेबसाइटवर, CERT-In ने म्हटले आहे की, iPhone 6s, iPhone 7 सीरिज, iPhone 8 सीरिज आणि iPhone SE फर्स्ट-जेन सारख्या जुन्या मॉडेल्सना याचा धोका आहे. त्यामुळे हे फोन्स लवकरात लवकर अपडेट करावे लागतील.

आयफोन असा अपडेट करा

आयफोन अपडेट करण्यासाठी, यूजर्सना Settings > General > Software update वर जावे लागेल. याव्यतिरिक्त, iPad Air, Pro आणि Mini वापरकर्त्यांना iPadOS च्या लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. अपडेट करण्यासाठी फक्त आयफोन पद्धतच काम करेल.

CERT-In ने म्हटले आहे की, Apple iOS आणि iPadOS मध्ये कर्नलमधील 'इम्प्रॉपर इनपुट व्हॅलिडेशन' आणि 'WebKit मधील इम्प्रॉपर स्टेट मॅनेजमेंट' यामुळे त्रुटी निर्माण होतात.

कर्नेल हा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा महत्त्वाचा भाग असतो, तर WebKit हे Apple Safari ब्राउझरमागील प्रमुख तंत्रज्ञान आहे.

सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे की, असुरक्षिततेचा फायदा घेऊन, हॅकर्स टारगेट सिस्टमवर आर्बिटरी कोड कार्यान्वित करु शकतात. म्हणजेच हॅकर्स डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात.

CERT-In ने हा हाय लेव्हल वॉर्निंग दिली आहे. Apple ने iPhones साठी नवीन iOS अपडेट जारी केल्यानंतर काही दिवसांनी सरकारची वॉर्निंग आली आहे.

आयफोन व्यतिरिक्त, iPadOS अपडेट्सही देखील जारी करण्यात आली आहेत. अॅपलच्या सपोर्ट पेजवर असे म्हटले आहे की सुरक्षा फर्म कॅस्परस्कीच्या संशोधकांनी कमजोरी शोधली आहे.

प्रभावित सॉफ्टवेअर्सची यादी

Apple macOS Monterey 12.7 पूर्वीचे व्हर्जन

Apple macOS Ventura च्या 13.6 पूर्वीचे व्हर्जन

Apple watchOS च्या 9.6.3 पूर्वीचे व्हर्जन

Apple watchOS च्या 10.0.1 पूर्वीचे व्हर्जन

Apple iOS च्या 16.7 च्या पूर्वीचे व्हर्जन आणि iPadOS च्या 16.7 च्या पूर्वीचे व्हर्जन

Apple iOS च्या 17.0.1 पूर्वीचे व्हर्जन आणि iPadOS च्या 17.0.1 पूर्वीचे व्हर्जन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT