The inclusion of retail and wholesale trade is an important milestone in MSMEs- PM Modi Dainik Goamntak
अर्थविश्व

किरकोळ व्यापार, घाऊक व्यापाराचा समावेश हा एमएसएमईतला महत्त्वाचा टप्पा - PM Modi

नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.त्याच योजनेबद्दल पंतप्रधान मोदी(PM Modi) यांनी आपले मत मांडले आहे.

दैनिक गोमन्तक

किरकोळ व घाऊक व्यापारांना एमएसएमई(MSME) म्हणून समाविष्ट केल्याने केंद्र सरकारने(Central Government) एमएसएमईसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी शनिवारी यास एक “महत्त्वाचा टप्पा” असल्याचे म्हटले आणि ते म्हणाले की, या निर्णयामुळे व्यपाऱ्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल आणि त्यांना विविध फायदेही मिळतील. असे आश्वासनही नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी दिली आहे .

"आमच्या सरकारने किरकोळ व घाऊक व्यापारास एमएसएमई म्हणून समाविष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे कोट्यावधी व्यापाऱ्यांना सुलभ वित्त, इतर विविध लाभ मिळण्यास मदत होईल आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. आम्ही आमच्या व्यापार्‍यांना सक्षम बनविण्यासाठी वचनबद्ध आहोत," असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे .

किरकोळ व घाऊक व्यापारांना एमएसएमई म्हणून समाविष्ट केल्याने केंद्रीय एमएसएमई व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.त्याच योजनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपले मत मांडले आहे.

सुधारित मार्गदर्शक सूचनांमुळे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापा-यांना फायदा होणार असून किरकोळ व घाऊक व्यापार एमएसएमईच्या कक्षेत सोडले गेले आहेत, आता सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ व घाऊक व्यापाराला आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्य क्षेत्रातील कर्जाचा लाभ मिळेल.असेही नितीन गडकरी यांनीह सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT