Thar, Scarpio And XUV 700 Dainik Gomantak
अर्थविश्व

​Thar, Scorpio आणि XUV700 महागल्या, जाणून घ्या काय आहेत नवीन किमती

Mahindra & Mahindra: दुसरीकडे कंपनीने XUV700 च्या आठ व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत. ज्यामध्ये चार एंट्री-लेव्हल पेट्रोल प्रकारांमध्ये 15,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

​Price Hike in Thar, Scorpio and XUV700, know what are the new prices:

Mahindra & Mahindra ने आपल्या प्रमुख SUV मॉडेल Scorpio-N, Thar आणि XUV700 च्या किमती वाढवल्या आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सच्या विशिष्ट प्रकारांवर ही दरवाढ लगेचच लागू झाली आहे.

XUV700 च्या किमती सर्वाधिक वाढल्या

XUV700 SUV च्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. AX7 L पेट्रोल प्रकार, विशेषत: 7-सीट कॉन्फिगरेशन आणि मॅन्युअल गिअरबॉक्स असणाऱ्या गाडीच्या किमतीत 57,000 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असलेल्या त्याच मॉडेलच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 53,000 रुपयांनी वाढली आहे.

दुसरीकडे कंपनीने XUV700 च्या आठ व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत. ज्यामध्ये चार एंट्री-लेव्हल पेट्रोल प्रकारांमध्ये 15,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 5-सीट पर्यायाने सुसज्ज असलेल्या AX5 डिझेल व्हेरिएंटची किंमत 21,000 रुपयांनी कमी झालीआहे.

आता XUV700 ची किंमत 13.99 लाख ते 26.99 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ज्यामध्ये सात प्रकारांच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक

Scorpio-N आणि Scorpio क्लासिक मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर, या SUV च्या सर्व प्रकारांच्या किमतीत वाढ झाली आहे. ही दरवाढ 1,000 रुपये ते कमाल 40,000 रुपयांपर्यंत आहे.

पण ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Z8 7-सीटर व्हेरियंटची सध्याची किंमत 23.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) कायम ठेवली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह Z8 L 6-सीटर व्हेरियंटवर या लाइनअपमधील सर्वाधिक किमतीत वाढ झाली आहे.

एंट्री-लेव्हल पेट्रोल Scorpio-N मध्ये 34,000 ची वाढ झाली आहे. तर एंट्री-लेव्हल डिझेल व्हेरियंटची किंमत 24,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे Scorpio-N SUV आता 13.60 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 24.54 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

थार किती महाग झाली?

महिंद्रा अँड महिंद्राने थार एसयूव्हीच्या सर्व प्रकारांच्या किमतीही वाढवल्या आहेत. AX(O) डिझेल मॅन्युअल प्रकारात सर्वाधिक किमतीत वाढ झाली आहे, ज्याची किंमत आता 35,000 रुपयांनी वाढली आहे. याव्यतिरिक्त, ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह टॉप-एंड पेट्रोल व्हेरिएंट LX ची ​​किंमत ₹34,000 ने वाढली आहे. यासह, थारची सुरुवातीची किंमत आता ₹ 11.25 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत ₹17.20 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT