Tata Tiago vs Maruti Suzuki Swift Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Tiago vs Maruti Suzuki Swift: अपडेटेड टाटा टियागो Vs मारुती स्विफ्ट; फीचर्स, मायलेज आणि किंमतमध्ये कोण भारी?

Tata Tiago vs Maruti Swift, Which Budget Hatchback is Better in 2025: जर तुम्हाला बजेटमध्ये कार घ्यायची असेल तर टाटा आणि मारुती कार एक उत्तम पर्याय ठरु शकतात. टाटा टियागोला यावर्षी एक नवीन अपडेट मिळाले आहे. पण मारुती स्विप्टला गेल्या वर्षीच अपडेट मिळाले.

Manish Jadhav

जर तुम्हाला बजेटमध्ये कार घ्यायची असेल तर टाटा आणि मारुती कार एक उत्तम पर्याय ठरु शकतात. टाटा टियागोला यावर्षी एक नवीन अपडेट मिळाले आहे. पण मारुती स्विप्टला गेल्या वर्षीच अपडेट मिळाले. टाटा टियागो आणि मारुती स्विफ्ट त्यांच्या शानदार फिचर्ससाठी लोकप्रिय आहेत. या दोन्ही कार क्लासिक डिझाइन, अफलातून फिचर्स आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दोन्ही कारपैकी कोणती कार खरेदी करायची याबाबत गोंधळलेले असाल तर तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार निर्णय घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला या दोन्ही कारबाबत सविस्तररित्या सांगणार आहोत...

अपडेटेड टाटा टियागो की मारुती स्विफ्ट?

मारुती स्विफ्ट बोल्ड आणि स्पोर्टी लूकमध्ये येते. या कारमध्ये (Car) तुम्हाला क्रोम ग्रिल, एलईडी डीआरएल, डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प पहायला मिळतील. कार तिच्या शानदार डिझाइनमुळे खूपच स्टायलिश दिसते. जर टाटा टियागोबद्दल बोलायचे झाल्यास, तिचे डिझाइन अगदी प्रीमियम आणि कॉम्पॅक्ट दिसते. त्यात सिग्नेचर ट्राय-एरो ग्रिल आहे. याशिवाय, एलईडी डीआरएल, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स दिसत आहेत.

कोणती कार जास्त मायलेज देते?

मारुती स्विफ्ट 25-26 किमी/लीटर मायलेज देऊ शकते. टाटा टियागो सीएनजीचा मायलेज मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन व्हेरिएंटच्या ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. मॅन्युअल व्हेरिएंट प्रति किलोग्रॅम 26.49 किलोमीटर मायलेज देते. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट प्रति किलोग्रॅम 28.06 किलोमीटर मायलेज देते.

बजेट फ्रेंडली आणि सुरक्षितता कार

मारुती स्विफ्टच्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 9.65 लाख रुपये आहे. मारुती स्विफ्टच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपये आहे. दुसरीकडे, टाटा टियागोची बेस व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 4.99 लाख रुपये मोजावे लागतील. टाटा टियागोच्या टॉप मॉडेलची किंमत 7.45 लाख रुपये आहे. तर टाटा टियागोच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. मारुती स्विफ्टमध्ये जास्त मायलेज आणि अॅडव्हान्स फिचर्स आहेत. पण जर तुम्हाला बजेट फ्रेंडली आणि सुरक्षितता कार हवी असेल तर टाटा टियागो हा उत्तम पर्याय असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT