Tata Technologies IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Technologies IPO: टाटा मोटर्सचे शेअर्स असणाऱ्यांचे बल्ले बल्ले; मिळणार 'हा' लाभ...

टाटा ग्रुपच्या Tata Technology या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे

Akshay Nirmale

Tata Technologies IPO Updates: टाटा टेक्नॉलॉजीज या टाटा कंपनीच्या बहुप्रतिक्षीत आयपीओ ची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून अर्थविश्वात रंगली आहे. तब्बल दोन दशकांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी 10 टक्क्यांपर्यंत इक्विटी शेअर्स राखीव ठेवता येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत त्यांना टाटा टेक्नॉलजीच्या IPO मध्ये शेअर्स सहज मिळू शकतात.

आता Tata Technologies IPO संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. कंपनीने सेबीला सादर केलेल्या परिशिष्ट दस्तऐवजातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी 10 टक्के इक्विटी शेअर्स राखीव असू शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत त्यांना IPO मध्ये शेअर्स सहज मिळू शकतात. याशिवाय या IPO मधील काही हिस्सा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो.

परिशिष्ट पेपरनुसार, पोस्ट ऑफर इक्विटी शेअर्सपैकी 0.50 टक्क्यांपर्यंत शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवता येतात.

आयपीओला सेबीचा ग्रीन सिग्नल

टाटा टेक्नॉलॉजीजला भांडवली बाजार नियामक सेबीकडून IPO लाँच करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कंपनी चालू तिमाहीत IPO लाँच करू शकते अशी अपेक्षा आहे. या IPO अंतर्गत कंपनी 9 कोटी 57 लाख 8 हजार 984 शेअर्स जारी करू शकते. या IPO ला SEBI कडून 28 जून रोजी मंजुरी मिळाली.

परिशिष्ट पेपरनुसार दर्शनी मूल्य 2 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या प्रवर्तक टाटा मोटर्स लिमिटेड द्वारे 8,11,33,706 पर्यंत शेअर्स OFS अर्थात ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जाऊ शकतात.

याशिवाय अल्फा टीसी होल्डिंगद्वारे 97,16,853 शेअर्स जारी केले जातील. टाटा कॅपिटल ग्रोथ फंड द्वारे 48,58,425 पर्यंत शेअर्स जारी केले जाऊ शकतात.

टाटा टेकमध्ये टाटा मोटर्सचा मोठा हिस्सा

टाटा टेकमध्ये टाटा मोटर्सची 74.69 टक्के भागीदारी आहे. याशिवाय, अल्फा टीसी होल्डिंग्सचा 7.26 टक्के सहभाग आहे आणि उर्वरित शेअरमध्ये टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 चा 3.63 टक्के सहभाग आहे.

या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान 35 % शेअर्स राखीव असतील. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी किमान 15 टक्के शेअर्स राखीव असतील. टाटा समूहाचा शेवटचा IPO 19 वर्षांपूर्वी 2004 मध्ये आला होता. तो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO होता.

कंपनीचा व्यवसाय

टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे, जी अभियांत्रिकी सेवा पुरवते. हे ऑटो, एरोस्पेस, औद्योगिक अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगांना उत्पादन विकास आणि टर्नकी सोल्यूशन्स सेवा प्रदान करते.

टाटा टेक जगातील अनेक देशांमध्ये काम करते. कंपनीचे जगभरात 9300 कर्मचारी आहेत. कंपनीचा व्यवसाय उत्तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत पसरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT