tata 
अर्थविश्व

हे टाटाच करू शकतात! कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 60 वर्ष पगार

गोमंन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: संपूर्ण देश कोरोना(Covid-19) साथीच्या आजाराने जखडला असून, सर्वसामान्यांपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच टाटा स्टीलने (Tata Steel Employees)आपल्या कर्मचार्‍यांसाठी "कर्मचारी सोशल सिक्योरिटी स्कीम" (Employee Social Security) जाहीर केली. ही योजना जाहीर झाल्यापासून टाटा कंपनी चर्चेत आहे. या योजनेनुसार, जर एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू कोरोनामुळे झाला तर त्याचे कुटुंब किंवा नॉमिनी व्यक्तीला पुढील 60 वर्षे पगार मिळत राहणार आहे.(Tata Steel announces Employee Social Security Scheme ​families of employees will get 60 years full salary) 

टाटा स्टीलची सर्वात मोठी घोषणा 
टाटा स्टील मॅनेजमेन्टने एक परिपत्रक काढले आहे, त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आमच्या कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर सामाजिक सुरक्षा अंतर्गत कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील पुढील 60 वर्ष त्या कुटूंबाला संपूर्ण वेतन देईल. , इतकेच नाही, तर सर्व वैद्यकीय फायदे आणि घरांच्या सुविधाही चालू ठेवणार असल्याचे कंपनीच्या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनी कर्मचार्‍यांच्या मुलांचं पदवीपर्यंत च्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असेही म्हटले आहे.

कर्मचार्‍यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली
टाटा स्टील मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, आमची कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या आणि भागधारकांच्या हिताबद्दल विचार करत असते. आजही आम्ही हेच करत आहोत. कोविडच्या काळात टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 

टाटा ग्रुपच्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी प्रसिध्द आहेत, टीसीएस सारख्या कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या फायद्यासाठी वेगवेगळे स्टॅडर्ड सेट केले आहेत. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे जी आपल्या कर्मचार्‍यांसाठी 8 तास काम, बोनस, सामाजिक सुरक्षा, मातृत्व रजा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अशा सुविधा देते. टाटांच्या पुढाकारानंतरच देशातील इतर कंपन्यांनीही असे निकष अवलंबले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT