Altroz Models Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Car: टाटाच्या 'या' कारवर मिळतेय तब्बल 'इतक्या' लाखांची सूट! जाणून घ्या अफलातून फिचर्स, मायलेज अन् बरचं काही

Tata Motors Car Discount April 2025: अल्ट्रोज रेसरवर 1.35 लाखां ची सूट दिली जात आहे. टाटा अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या MY25 व्हर्जनवर 45000 रुपयांची सूट देत आहे.

Manish Jadhav

भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने एप्रिल 2025 पासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. परंतु टाटा आता 2024 मध्ये उत्पादित झालेल्या त्यांच्या कारवर सूट देत आहे. यापैकी काही मॉडेल्स अद्याप विक्रीला नाहीत. त्यामुळे, कंपनी या वाहनांवर सवलत देऊन शक्य तितक्या लवकर स्टॉक संपण्याच्या तयारीत आहे. टाटाची अशीच एक कार आहे, ज्यावर तब्बल 1.35 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

दरम्यान, एप्रिल 2025 मध्ये टाटा मोटर्सकडून (Tata Motors) अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅकच्या MY24 व्हर्जनवर सर्वाधिक सूट देण्यात आली. कारच्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (नॉन-रेसर) व्हेरिएंटवर 1 लाखांची सूट दिली जात आहे. त्याचवेळी, अल्ट्रोज रेसरवर 1.35 लाखां ची सूट दिली जात आहे. टाटा अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या MY25 व्हर्जनवर 45000 रुपयांची सूट देत आहे.

कारची किंमत जाणून घ्या

अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅकमध्ये स्टायलिश डिझाइन, शानदार फीचर्स लिस्ट आणि फ्यूल एफिशिएंट इंजिन आहे. ही कार स्टेबल असून हाय स्पीड रायडिंगदरम्यान आरामदायी वाटते. टाटा अल्ट्रोजच्या बेस मॉडेलची किंमत 7.57 लाख रुपयांपासून सुरु होते. टॉप मॉडेलची किंमत 12.83 लाख रुपयांपर्यंत (ऑन-रोड दिल्ली) जाते.

5 स्टार सुरक्षा रेटिंग

टाटा अल्ट्रोझला ग्लोबल एनसीएपीकडून पाच-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESP, हिल होल्ड कंट्रोल, आफ्टर-इम्पॅक्ट ब्रेकिंग, रोल-ओव्हर मिटिगेशन आणि कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आहे. याशिवाय, स्पीड-सेन्सिंग ऑटो लॉक, पॅनिक ब्रेक अलर्ट, इम्पॅक्ट-सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर आहेत, जे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करतात.

टाटा अल्ट्रोज मायलेज

एआरएआयच्या मते, टाटा अल्ट्रोजचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटसाठी मायलेज प्रति लिटर 19.17 ते 23.64 किलोमीटर आहे, तर सीएनजी प्रकारासाठी ते 26.2 किलोमीटर प्रति किलोग्रॅम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT