Anil Ambani  Dainik Gomantak
अर्थविश्व

अनिल अंबानींचे टेन्शन वाढले! रिलायन्स कॅपिटल खरेदीच्या शर्यतीतून टाटा, अदानी बाहेर

अनिल अंबानींच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलला खरेदीदार मिळत नाहीये. तर दुसरीकडे, दिवाळखोरीचा सामना करत असलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या लिलाव प्रक्रियेतून पाच मोठ्या लिलावकर्त्यांनी त्यांच्या बोली मागे घेतल्या आहेत. या पाच कंपन्यांमध्ये अदानी आणि टाटा समूहाचाही समावेश आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटल (RCAP) ची मालमत्ता खरेदी करण्याच्या शर्यतीतून अदानी आणि टाटा (Tata) यांच्यासह पाच प्रमुख लिलावकर्ते बाहेर पडले आहेत. मोठी बोली लावणाऱ्यांमध्ये पिरामल एंटरप्रायझेस हे एकमेव नाव उरले आहे.

या कंपन्या बाहेर पडल्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकस्टोन, एचडीएफसी (HDFC) एर्गो, आयसीआयसीआय लोम्बार्ड, टाटा समूह आणि अदानी समूह यांनी या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आहे. टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीने यापूर्वी RCap चे सामान्य विमा युनिट खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले होते.

FE बातम्यांनुसार, पिरामल एंटरप्रायझेस अजूनही रिलायन्स कॅपिटल विकत घेण्याच्या शर्यतीत असून निधीसाठी येस बँक आणि टोरेंट ग्रुपशी बोलणी करत आहे. याशिवाय, झुरिच इन्शुरन्सने RCAP च्या सामान्य विमा क्लस्टरसाठी आणि चोलामंडलम ग्रुपने त्यांच्या जीवन विमा क्लस्टरसाठी स्वारस्य दाखवले आहे.

लिलावकर्त्यांना दोन पर्याय होते

कर्जदारांनी जारी केलेल्या रिक्वेस्ट फॉर रिझोल्यूशन प्लॅन (RFRP) नुसार, बोलीदारांकडे दोन पर्याय आहेत - एकतर कंपनीच्या संपूर्ण मालमत्तेसाठी किंवा तिच्या एक किंवा अधिक क्लस्टर्ससाठी (Subsidiaries). रिलायन्सच्या उपकंपन्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स आहेत.

मुदत दोन महिन्यांनी वाढवली

रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या संपादन प्रक्रियेला लिलावकर्त्यांकडून मिळालेला थंड प्रतिसाद पाहता, कंपनीच्या कर्जदारांनी ठराव प्रक्रियेची अंतिम मुदत दोन महिन्यांनी वाढवून 2 नोव्हेंबर केली आहे. ही मुदत आधीच 3 जून ते 2 सप्टेंबर 2022 पर्यंत 90 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) ने RCL च्या रिझोल्यूशन प्रक्रियेसाठी दुसर्‍यांदा ही मुदत वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT