DA Hike in Tamilnadu Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांची चांदी, सरकारने वाढवला महागाई भत्ता अन् बोनस

DA Hike in Tamilnadu: नवीन वर्षाची सुरुवात होताच तामिळनाडूतील सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मंदिरांतील स्थायी कर्मचाऱ्यांनाही आनंदाची बातमी मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

DA Hike in Tamilnadu: नवीन वर्षाची सुरुवात होताच तामिळनाडूतील सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मंदिरांतील स्थायी कर्मचाऱ्यांनाही आनंदाची बातमी मिळाली आहे. नुकतीच राज्य सरकारने राज्यात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.

यानंतर आता मंदिर कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभाग (एचआर आणि सीई) अंतर्गत कायमस्वरुपी मंदिर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) चार टक्के वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

1 जानेवारी 2023 पासून लागू होईल

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मंदिर कर्मचाऱ्यांचा भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्यात आला आहे. वाढीव भत्ता 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे. मंदिर कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार फेब्रुवारीत येणे अपेक्षित आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सुमारे 10 हजार स्थायी कामगारांना होणार आहे. यामुळे सरकारवर वर्षाला सात कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

हा आदेश अशा मंदिरांना लागू होईल

ज्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना हा आदेश लागू आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिरातील सर्व कामगारांसाठी (पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा दैनंदिन वेतन) पोंगल बोनस 2,000 रुपयांवरुन 3,000 रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सरकारी तिजोरीवर दीड कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही वाढला आहे

नुकतेच तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याची घोषणा केली होती. हे देखील पूर्वीच्या 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्यात आले आहे. वर्षाच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सरकारने ही घोषणा केली. यासोबतच पेन्शनधारकांना 4 टक्के अतिरिक्त डीएही मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए लवकरच वाढणार आहे

केंद्र सरकार लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ करणार आहे. मार्चमध्ये होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांच्या (Employees) डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करु शकते. यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सीबीडीटीच्या आरोपींना सशर्त जमीन मंजूर

Panaji Smart City: पणजीत नागरिकांच्या जीवाशी खेळ! खोदकाम सुरू; पण फलक नाहीत; दुचाकीस्वारांना धोका

Tribal Reservation Bill: आदिवासी विधेयकावर लोकसभेत होणार चर्चा; राजकीय प्रतिनिधित्वाला मिळणार बळकटी; तानावडेंनी दिली माहिती

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Cabinet: फडणवीस कि पुन्हा शिंदे? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे गोवा मंत्रिमंडळातील बदल खोळंबला

SCROLL FOR NEXT