Taliban stop Import, Export business with Indian Dainik Gomantak
अर्थविश्व

तालिबानचा भारताला पहिला झटका,व्यापाराला लावला ब्रेक

अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत केल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताला (India)व्यापारात पहिला झटका दिला आहे

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत केल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताला (India)व्यापारात पहिला झटका दिला आहे (India Afghanistan Business). अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केल्यानंतर तालिबानने भारतातून होणाऱ्या आयात-निर्यातीवर (Import-Export) बंदी घातली आहे.फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानातून (Pakistan) भारताला होणाऱ्या सर्व मालवाहतुकीवर बंदी घातली आहे. यामुळे अफगाणिस्तानमधून होणारी आयात पूर्णपणे बंद झाली आहे.(Taliban stop Import, Export business with Indian)

डॉ.अजय सहाय यांच्या म्हणण्यानुसार एफआयईओ अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.तसेच ते म्हणाले की, भारताचे अफगाणिस्तानशी खूप जुने संबंध आहेत. भारताने तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार असून 2021 मध्ये भारताची अफगाणिस्तानला निर्यात 83.5 दशलक्ष डॉलर्स होती तर या काळात भारताने तेथून 51 दशलक्ष किंमतीच्या वस्तू आयात केल्या आहेत.

भारताने व्यापाराव्यतिरिक्त तिथे खूप गुंतवणूक देखील केली आहे. भारताने अफघाणीस्तानात 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून भारत सध्या तिथे 400 प्रकल्पांवर काम करत आहे, त्यापैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. भारत आपला काही माल आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडॉरद्वारे अफगाणिस्तानला निर्यात करतो जो चांगला चालला आहे. याव्यतिरिक्त, काही निर्यात दुबई मार्गाने देखील होत असते.

एफआयईओचे डीजी म्हणाले की भारत अफगाणिस्तानला साखर, फार्मास्युटिकल्स, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्स आणि कांद्यासारख्या वस्तू आयात केल्या जातात. दरम्यान अफगाणिस्तानात राजकीय स्थिरता आल्यावर सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT