Sunflower Oil  Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतात सूर्यफूल तेलाच्या किमतीत मोठी वाढ?

भारतामध्ये रशिया आणि युक्रेनमधून 70 टक्के सूर्यफूल तेलाची आयत केली जाते.

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मार्केटमधील सर्वात प्रसिद्ध सूर्यफूल तेलाच्या (Sunflower Oil) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आता तुम्हाला 15 लीटर तेलासाठी 3000 रुपये मोजावे लागतील. तीन महिन्यापूर्वी या तेलाची किंमत 140ते 150 रुपये एवढी होती तर आता 170- 190 रुपये एवढी झाली आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न पणन समिनीचे अधिकारी तसेच गुलटेकडी मार्केट यार्डमधील घाऊक व्यापाऱ्यांनी दिली.

मागील वर्षी 15 लिटर सूर्यफूल तेलाची (Sunflower Oil) किमत 2400 रुपये होती, परंतु सध्या सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine) विपरीत परिणाम आयातीवर झाला आहे. त्यामुळे मागणी (Demand) आणि पुरवठ्याचा मेळ बसत नसल्याने सूर्यफूल तेलाच्या किमातींमध्ये (Price) प्रचंड वाढ झाली आहे.

रिफाईड सूर्यफूल तेलाची स्थानिक बाजारपेठेमध्ये 2650 ते 3100 रुपये प्रति लिटर आहे. भारतामध्ये (India) रशिया आणि युक्रेनमधून 70 टक्के सूर्यफूल तेलाची आयत केली जाते. भारतीय उत्पादकांकडून पुरेसा पुरवठा होत नाही. सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबवल्यामुळे पाम, शेंगदाणे आणि सोयाबीन यासारख्या विविध प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे, परंतु गेल्या काही महिन्यापासून तेलाच्या मागणीमध्ये आणि पुरवठ्यामध्ये फरक दिसून येत आहे, असे गुलटेकडी मार्केट यार्डमधील तेल व्यापर्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT