Sukanya Samriddhi Yojana: या योजनेचा लाभ घेऊन करा तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

Sukanya Samriddhi Yojana: या योजनेचा लाभ घेऊन करा तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित

Sukanya Samriddhi Yojana या योजनेवर 7.6 टक्के व्याज दिले जात असून नवीन व्याजदर 1 जानेवारी 2022 रोजी जाहीर केला जाईल.

दैनिक गोमन्तक

तुम्हाला माहिती असेलच कि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) हि मुलींसाठी एक उत्तम योजना आहे. हे खाते 10 वर्षांपेक्षा लहान मुलींच्या (Girl) नावाने उघडता येते. या योजनेत दरमहा काहीतरी जमा केले जाते. मॅच्युरिटीवर एकर कमी रक्कम उपलब्ध आहे. जी मुलींच्या शिक्षण (Education) आणि लग्नासारख्या महत्वाच्या कामासाठी वापरली जाऊ शकते. सुकन्या योजने अंतर्गत सरकार (Government) दर तीन महिन्यानी व्याजदराचा निर्णय घेते. यामुळे 1 जानेवारी 2022 रोजी सुकन्या योजनेसाठी नवीन व्याजदराची घोषणा केलीं जाऊ शकते.

सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के आहे. व्याजदराबद्दल बोलायचे झाल्यास, हा निर्णय सरकारी रोख्यांवर उपल्बध व्याजदराच्या आधारावर घेतला जातो. म्हणजेच जी-सॅक. 2014 मध्ये पंतप्रधान मोदीनी हि योजना सुरु केली होती. हे खाते 10 वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने खाते उघडता येते. हे खाते वयाच्या 21 व्य वर्षी परिपक्क होते. या योजनेत किमान 250 रुपये जमा करता येतील. एका आर्थिक वर्षात कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे.

* सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत भारतातील मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा बँकेमध्ये (Bank) फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते कुटुंबातील दोन मुलींसाठी उघडता येते.

* योजनेची वैशिष्ट्ये

* या योजनेत खाते उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 15 वर्षे पूर्ण होईपर्यंत ठेवी करता येतील.

* एका आर्थिक वर्षात खात्यात किमान 250 रुपये जमा न केल्यास खाते डीफॉल्ट मानले जाईल.

* खाते उघडण्यासाठी तारखेपासून 15 वर्षे होण्यापूर्वी डिफॉल्ट खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते. यासाठी प्रत्येक थकबाकीदार वर्षांसाठी 50 रुपयांच्या डिफॉल्टसह किमान 250 रुपये भरावे लागतील .

* आयकर कायद्याच्या कलाम 80 अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.

* या योजनेत मिळणारे व्याज देखील आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.

* मुलीचे 18 वर्षांचे होईपर्यंत पालक खाते चालवतील.

* मुलीचे 18 वर्ष वाय पूर्ण झाल्यांनतर किंवा 10 उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून पैसे काढता येतात.

* खात्याची मॅच्युरिटी खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी किंवा त्याच्या लग्नाच्या वेळी 18 वर्षांनी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT