SBI  Danik Gomantak
अर्थविश्व

SBI Loss: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक पहिल्या तिमाहीत तोट्यात, एवढा घटला नफा

गोमन्तक डिजिटल टीम

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) पहिल्या तिमाहीचा नफा-तोटा जाहीर केला आहे. स्टँडअलोन (Standalone) आधारावर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात 7 टक्क्यांनी घट झाली आहे. बँकेचा निव्वळ नफा 6,069 कोटी रुपयांवर आला आहे. उत्पन्न घटल्याने बँकेचा नफाही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

किती घटले उत्पन्न?

स्टेट बँक ऑफ इंडियाचे वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत आर्थिक उत्पन्न 74,998.57 कोटी रुपयांवर घसरले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचे उत्पन्न 77,347.17 कोटी रुपये होते.

स्टेट बँकने शनिवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल-जून तिमाहीत बँकेला 6,504 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

NPA किती ?

बँकेचे ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (NPA) गुणोत्तर मागील वर्षीच्या 5.32 टक्क्यांवरून तिमाहीत 3.91 टक्क्यांवर पोहोचले. त्याचप्रमाणे, निव्वळ NPA देखील जून 2022 मध्ये 1.02 टक्‍क्‍यांवर घसरला आहे. मागील वर्षाच्या जून तिमाहीत तो 1.7 टक्‍क्‍यांवर होता.

स्टेट बँकेचा निव्वळ नफा किरकोळ घसरून 7,325.11 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये ते 7,379.91 कोटी रुपये होते. SBI च्या स्टॉकबद्दल (SBI Stocks) बोलायचे तर कंपनीच्या स्टॉकने YTD वेळेत गुंतवणूकदारांना (Investors) 13 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 22.20 टक्के परतावा दिला आहे आणि गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 90.02 टक्के परतावा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT