SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI च्या करोडो ग्राहकांना लागली लॉटरी, बँक देणार इतकी मोठी रक्कम; थेट खात्यात येणार पैसे!

Manish Jadhav

State Bank Of India: स्टेट बँकेत (SBI Account) खाते असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांना खूश केले आहे.

देशाच्या या सरकारी बँकेत तुमचेही खाते असेल, तर आता बँक तुम्हाला पूर्ण 57,000 रुपये देणार आहे. होय... बँकेकडून ग्राहकांना वेळोवेळी अनेक सुविधा दिल्या जातात. आता तुम्हालाही हे पैसे मिळवण्याची संधी आहे.

जर तुम्ही SBI मध्ये RD केली तर तुम्हाला पूर्ण 57,658 रुपये अतिरिक्त मिळतील. कसे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

57,658 रुपये मिळतील

आरडी म्हणजेच आवर्ती ठेव योजना ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये दरमहा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 वर्षांसाठी दरमहा रु 5,000 ची आरडी केली आहे आणि तुम्हाला 6.75% दराने व्याज मिळत आहे, तर त्यानुसार तुम्हाला मॅच्युरिटीवर 57,658 रुपये अतिरिक्त मिळतील.

5 वर्षांत 3 लाख रुपये जमा करावे लागतील

5 वर्षांत तुमची गुंतवणूक (Investment) दरमहा रु. 5000 नुसार 3 लाख रुपये होईल, परंतु तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 3,57,658 लाख रुपये मिळतील. यापैकी 3 लाख रुपये तुमची गुंतवणूक रक्कम असेल आणि 57,658 रुपये व्याजाची रक्कम असेल.

ज्येष्ठ नागरिकांना किती फायदा होतो?

SBI ज्येष्ठ नागरिकांना आवर्ती ठेवींवर सामान्य ग्राहकांपेक्षा (Customers) जास्त व्याजाचा लाभ देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आरडी योजनेत गुंतवणूक केली तर त्याला 6.75 टक्के ते 7.25 टक्के व्याजाचा लाभ मिळतो.

आपण किती महिन्यांसाठी गुंतवणूक करु शकतो?

तुम्ही एसबीआयमध्ये 12 महिन्यांपासून 120 महिन्यांपर्यंत आरडी करु शकता. यामध्ये तुम्ही किमान 100 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता. तुम्ही SBI च्या आवर्ती ठेव योजनेत दरमहा फक्त 1,000 रुपये जमा करु शकता. तुम्ही दरमहा किती पैसे जमा करु इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT