CEO Ankiti Bose Dainik Gomantak
अर्थविश्व

सिंगापूरच्या Zilingo कंपनीने भारतीय वंशाच्या CEO अंकिती बोस यांची केली हकालपट्टी

सिंगापूरस्थित कंपनी झिलिंगोने (Zilingo) आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली भारतीय वंशाच्या सीईओ अंकिती बोस यांची हकालपट्टी केली आहे.

दैनिक गोमन्तक

सिंगापूरस्थित कंपनी झिलिंगोने आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली भारतीय वंशाच्या सीईओ अंकिती बोस यांची हकालपट्टी केली आहे. आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींवरुन फॉरेन्सिक ऑडिटनंतर झिलिंगो कंपनीने शुक्रवारी भारतीय वंशाच्या सह-संस्थापक आणि सीईओ अंकिती बोस यांची हकालपट्टी केली. अंकितीने कंपनीच्या खात्यात कथित अनियमिततेची तक्रार केल्यानंतर 31 मार्च रोजी तिला निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, झिलिंगो (Zilingo) कंपनीने शुक्रवारी एक निवेदन जारी केले की "स्वतंत्र न्यायवैद्यक तपासणीनंतर, कंपनीने अंकिती बोसला (CEO Ankiti Bose) बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने तिच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे."

तथापि, कंपनीने बोस यांच्यावरील आरोप आणि ऑडिटमध्ये त्यांना काय आढळले याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती दिली नाही. 31 मार्च रोजी निलंबित झाल्यानंतर बोस यांनी छळाचे आरोप केले. तर दुसरीकडे, कंपनीने योग्य ती कारवाई केल्याचे तपासात सिद्ध झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

तसेच, 31 मार्चच्या निलंबनानंतर बोस यांनी शोषणाचे काही आरोप केले होते. आणि या संदर्भात योग्य कारवाई करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. "31 मार्चच्या निलंबनानंतर, 11 एप्रिल रोजी, अंकिती बोस यांनी प्रथमच बोर्डाला भूतकाळातील शोषणाच्या काही घटनांची माहिती दिली. गुंतवणूकदार (Investors) किंवा त्यांच्या नामांकित व्यक्तींविरुद्ध शोषणाची कोणतीही तक्रार नव्हती," असे निवेदनात म्हटले आहे.

कंपनीने सांगितले की, आरोपांची चौकशी करण्यासाठी एका उच्च सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती, ज्याने आपल्या अहवालात कंपनीने आरोपांवर योग्य कारवाई केल्याचे म्हटले आहे.

कंपनीने पुढे सांगितले की, शोषणाचे आरोप दडपण्यासाठी त्यांच्यावर निलंबनाची आणि चौकशीची कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या आहेत, तर स्वतंत्र फर्मच्या तपासात या आरोपांवर योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याशिवाय, झिलिंगोची सुरुवात 2015 मध्ये अंकिती बोस आणि कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ध्रुव कपूर यांनी केली होती. ही कंपनी फॅशन मर्चेंट्स आणि कारखान्यांना तंत्रज्ञानाचा (Technology) पुरवठा करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT