Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'ही' बडी कंपनी खरेदी करणार...

Shree Cement and Cow Dung: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.

Manish Jadhav

Shree Cement and Cow Dung: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.

केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री विमा फसल योजनेतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत झाले आहेत.

अलिकडेच छत्तीसगड सरकारने गोधन न्याय योजना देखील गोपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणली होती. या योजनेंतर्गत गोमूत्र आणि शेणखत हे गोपालकांकडून सरकारकडून खरेदी केले जात आहे.

कोळशाच्या ऐवजी शेणखताचा वापर करणार

गोपालकांकडून खरेदी केलेल्या गोमूत्र आणि शेणखताच्या बदल्यात राज्य सरकार शेतकऱ्यांना ठराविक रक्कम देते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे.

सिमेंट उत्पादक कंपनी श्रीसीमेंट आणि सरकार (Government) यांच्यात शेणखत खरेदीबाबत करार झाला आहे. सिमेंट कंपनी कोळशाऐवजी शेणखताचा वापर करणार आहे. हरित ऊर्जेला चालना देण्याच्या दिशेने छत्तीसगड सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे.

दररोज 10 मेट्रिक टन शेणखत खरेदी करणार आहे

मिळालेल्या माहितीनुसार, हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी श्री सिमेंट कंपनी कोळशाऐवजी दररोज 10 मेट्रिक टन शेणखत खरेदी करणार आहे.

सिमेंट कंपनी आणि छत्तीसगड (Chhattisgarh) सरकार यांच्यातील करारानुसार, बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यातील सिमगा ब्लॉकमध्ये असलेल्या श्री सिमेंट उद्योगाच्या वतीने शेणखत खरेदीसाठी संमती देण्यात आली आहे.

सरकारने 8.20 कोटी रुपये जारी केले

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी 2020 मध्ये 'गोधन न्याय योजना' सुरु केली. या योजनेंतर्गत राज्यातील पशुपालक आणि गो आश्रयस्थानांकडून शेणखत खरेदी करण्यात येत आहे.

शेणखतापासून सेंद्रिय खत, दिवे, अगरबत्ती, गुलाल आदी पदार्थ तयार केले जात आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्या गोपालकांना राज्य सरकारने 8.20 कोटी रुपये दिले आहेत.

तसेच, या करारानंतर श्री सिमेंट कंपनी आता कोळशाऐवजी शेणखत जाळणार आहे. सिमेंट तयार करण्यासाठी भट्टीत कोळशाच्या जागी आता शेणखत जाळले जाणार आहे. त्यामुळे कंपनीचा कोळशावर होणारा खर्चही कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT