Student Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना सरकार देणार स्कूटी! एक लाख लोकांना मिळणार रोजगार

Shivraj Singh Chouhan: राज्यात यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार असून सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच घटकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश विधानसभेत अर्थमंत्री जगदीश देवरा यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन लाख 14 हजार कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी काँग्रेस आमदारांनी गोंधळ घातला. राज्याच्या 15 व्या विधानसभेचा हा अंतिम अर्थसंकल्प आहे.

राज्यात यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार असून सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच घटकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात कोणताही नवीन कर लागू करण्यात आलेला नाही.

लाडली लक्ष्मी योजनेसाठी 60 हजार कोटी

अर्थसंकल्पादरम्यान काँग्रेस आमदाराला महागाईचा (Inflation) निषेध करण्यासाठी सिलिंडर घेऊन सभागृहात जायचे होते, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. यावेळी बराच गदारोळ झाला आणि नंतर काँग्रेस आमदारांनी बहिष्कार टाकला आणि घोषणाबाजी केली.

राज्यात सुरु होत असलेल्या लाडली लक्ष्मी योजनेसाठी 60 हजार कोटींची तरतूद, एक लाख सरकारी नियुक्त्या देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

क्रीडा विभागाचे बजेट 738 कोटी

तसेच मुख्यमंत्र्यांच्या कौशल्य विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडा विभागाचे 738 कोटींचे बजेट (Budget) असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच पट अधिक आहे. राज्य सरकार मुलींसाठी मुख्यमंत्री ई स्कूटी योजना आणत आहे.

गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या मुलींना ही स्कूटी मिळणार आहे. राज्यातील सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांपैकी बारावीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या मुलींना स्कूटी मिळणार आहे.

2007 पासून सुरु झालेल्या लाडली लक्ष्मी योजनेत 44 लाख 39 हजारांहून अधिक मुलींना लाभ मिळाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 929 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. सरकार लाडली लक्ष्मी योजना ही नवीन योजना आणत आहे, ज्यासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT