Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Senior Citizen Savings Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारची खास स्कीम, लाभ मिळवण्यासाठी...!

Senior Citizen Savings Scheme 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Manish Jadhav

Senior Citizen Savings Scheme 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजना जाहीर केली आहे, जी 60 वर्षांवरील लोकांसाठी आहे.

सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना काय आहे आणि तुम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घ्या...

ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे काय?

ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. जानेवारी-मार्च 2023 साठी, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी, हा व्याजदर 7.6 टक्के होता. ज्येष्ठ नागरिक किमान 1,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करु शकतात.

बचत योजनेवरील व्याज वाढले

सरकारने (Government) ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत आणखी एक बदल केला आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक सूट मिळते. ही योजना पूर्ण होण्याची मुदत 5 वर्षे आहे. यानंतर ती 3 वर्षांसाठी वाढवता येईल.

खाते कसे उघडायचे?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खाते उघडण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत 1000 रुपयांपासून खाते उघडता येते.

कोण गुंतवणूक करु शकते?

60 वर्षांवरील लोक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. याशिवाय, 55 ते 60 वयोगटातील सेवानिवृत्त कर्मचारीही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT