SBI Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI Amrit Kalash FD Scheme: SBI ची धमाकेदार स्कीम; 400 दिवसांत बनवतेय मालामाल; जाणून घ्या इंटरेस्ट रेट

SBI Amrit Kalash FD Scheme: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची 'अमृत कलश योजना' तुम्हाला अवघ्या 400 दिवसांत मालामाल बनवू शकते.

Manish Jadhav

SBI Amrit Kalash FD Scheme: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची 'अमृत कलश योजना' तुम्हाला अवघ्या 400 दिवसांत मालामाल बनवू शकते. SBI 'अमृत कलश' योजना ही 400 दिवसांची FD आहे, जी 7.6 टक्के दराने व्याज देते. या SBI योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वेळ आहे.

अमृत ​​कलश योजना – 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख

SBI च्या म्हणण्यानुसार, बँकेच्या अमृत कलश स्पेशल FD योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.10% व्याज मिळत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज देत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. बँकेने ही मुदत 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. या कालावधीत कोणीही ही योजना ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक करु शकते. अमृत ​​कलश याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना बँक लोन सुविधा देखील प्रदान करते. तुम्ही अमृत कलश योजनेअंतर्गत लोनसाठी अर्ज करु शकता.

400 दिवसात तुम्हाला मालामाल बनवतेय

बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणीही अमृत कलश स्पेशल योजनेमध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणूक करु शकतो आणि हमी परतावा मिळवू शकतो. SBI बँकेच्या मते, अमृत कलश एफडी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज पेमेंट घेऊ शकतात. SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात पाठवले जातात. SBI च्या वेबसाइटनुसार, अमृत कलश एफडीमध्ये 400 दिवसांपूर्वी जमा केलेले पैसे काढल्यावर, बँकेकडून लागू दर 0.50% आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT