SBI Alert  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI Alert : आज-उद्या SBI ग्राहक या सेवा राहणार बंद..

बँकेने दिले ट्विटर वॉलद्वारे स्पष्टीकरण..

दैनिक गोमन्तक

SBI Alert : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI ,State Bank of India) दिलेल्या माहिती नुसार सेवा प्रभावित बदल होणार असल्याचे समोर आले आहे. हे बदल आज पासून लागू होतील, म्हणजेच 11 आणि 12 डिसेंबर 2021 रोजी SBI च्या डिजिटल बँकिंग सेवा प्रभावित होतील, SBI ने त्यांच्या ट्विटद्वारे आपल्या ग्राहकांना ही माहिती दिली आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना बँकेने म्हटले आहे की, डिजिटल बँकिंग (Digital Banking) प्लॅटफॉर्म अद्ययावत करण्याचे प्रस्तावित काम असल्याने कामावर परिणाम होणार आहे.

SBI ने काय ट्विट केले आहे

SBI ने आपल्या ट्विटर वॉलवर (Tweetr Wall) लिहिले आहे की आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी रात्री 11.30 ते 12 डिसेंबर 2021 रोजी पहाटे 4.30 पर्यंत तंत्रज्ञान अपग्रेड करणार असल्याने. 300 मिनिटांच्या या कालावधीत ग्राहकांना काही गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. या कालावधीत SBI इंटरनेट बँकिंग / YONO / YONO Lite / YONO व्यवसाय / UPI सेवा उपलब्ध होणार नाहीत.

बँकेने खेद व्यक्त केला

SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने ग्राहकांच्या या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. ग्राहकांना बँकिंगचा (Banking) अनुभव चांगला यावा यासाठी हे काम आवश्यक असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. देशातील (Country) सर्वात मोठी बँक SBI च्या 22,000 पेक्षा जास्त शाखा आहेत. बँकेचे देशभरात 62,617 ATM/ADWM आणि 71,968 BC आउटलेट आहेत. 27 ऑक्टोबर 2021 ची परिस्थिती पाहिली तर त्यानुसार बँकेच्या ग्राहकांची संख्या 450 दशलक्षांपेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT