Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office: पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांना लागली लॉटरी, 5000 गुंतवून मिळवा मोठा लाभ!

Post Office: फ्रिक्वेन्सी डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट (RD) हा भारतातील सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे.

Manish Jadhav

Post Office: फ्रिक्वेन्सी डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट (RD) हा भारतातील सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे.

रिकरिंग डिपॉझिट स्कीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामध्ये तुम्हाला FD सारखी एकरकमी रक्कम जमा करावी लागत नाही, तर दर महिन्याला छोटी रक्कम जमा करावी लागते.

यावरील व्याज बचत खात्यापेक्षा जास्त आहे, परंतु एफडीपेक्षा कमी आहे. आरडीचा कार्यकाळ पाच वर्ष ते दहा वर्षांपर्यंत असू शकतो.

RD वर व्याज दर

पोस्ट ऑफिस (Post Office) आरडी योजना लहान बचत योजनांतर्गत येतात. केंद्र सरकारने एप्रिल ते जून 2023 साठी जाहीर केलेल्या नवीन व्याजदरांमध्ये आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांवरुन 6.2 टक्के करण्यात आले आहे.

पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, तुम्ही कोणत्याही सरकारी आणि खाजगी बँकेत (Bank) आरडी खाते उघडू शकता

आरडीचे दोन प्रकार आहेत

आरडी योजनेचे दोन प्रकार आहेत. पहिली नियमित आवर्ती ठेव आणि दुसरी फ्लेक्सी आवर्ती ठेव. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम जमा करावी लागेल.

उदाहरणार्थ, तुम्ही 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 4000 रुपये जमा कराल, नंतर त्याला नियमित आवर्ती ठेव म्हटले जाईल.

तर, फ्लेक्सी रिकरिंग डिपॉझिटमध्ये, तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमचा मासिक हप्ता वाढवू किंवा कमी करु शकता.

RD मध्ये व्याज मोजण्यासाठी सूत्र

M = R [(1+i)n – 1] भागिले 1-(1+i)(-1/3)

यामध्ये M म्हणजे मॅच्युरिटी दरम्यान मिळालेली रक्कम. R म्हणजे एकूण भरलेल्या मासिक हप्त्यांची संख्या. N म्हणजे RD चा कार्यकाळ आणि I म्हणजे व्याजदर.

RD मध्ये गुंतवणुकीवर किती नफा होतो

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला 6.2 टक्के व्याजदराने 5000 रुपये जमा केले तर 5 वर्षानंतर तुम्हाला 3.52 लाख रुपये मिळतील आणि 10 वर्षांनंतर ते 8.32 लाखांपर्यंत वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT