Oil  Dainik Gomantak
अर्थविश्व

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय बाजारावर परिणाम, 15 दिवसांत 30 टक्क्यांनी महागले खाद्यतेल

देशात कोरोनाचं सावट असताना आता रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) यांच्यातील युध्दामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचं सावट असतानाच आता रशिया-युक्रेन यांच्यातील युध्दामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम मोहरीच्या तेलाच्या दरावर अद्याप झालेला नसला तरी येत्या काळात मोहरीच्या तेलाच्या दरावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. किंबहुना देशभरातील बाजारपेठेत (Indian Market) खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. विशेषतः रिफाइंड आणि सूर्यफूल तेलाच्या किमती गेल्या 15 दिवसांत सुमारे 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. (Russia Ukraine War Affects Indian Market Edible Oil Rises 30 Per Cent In 15 Days)

दरम्यान, 15 दिवसांपूर्वी रिफाइंड 140 रुपये प्रति लिटर होते, ते आता 165 रुपये प्रति लिटर झाले आहे. सूर्यफूल तेल पूर्वी 140 रुपये होते, ते आता 170 रुपये झाले आहे. त्याचबरोबर देशी तुपाचा दर पूर्वी 360 रुपये होता, त्यात आता 420 रुपयांनी आणि वनस्पती तेलात 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

तसेच, रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) हे सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे उत्पादक देश आहेत. आधी कोरोना आणि आता युद्धामुळे पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून येत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यामागे हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये जगभरातील कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्क्यांची वाढ, रशिया आणि युक्रेन युद्ध, महागडी शिपमेंट, पुरवठा लाइनमध्ये व्यत्यय आणि हिवाळ्यातील पाम तेलाची आयात यांचा समावेश आहे.

शिवाय, कमोडिटी तज्ज्ञ डॉ रवी सिंग यांनी म्हटले की, ''20% खाद्य तेल युक्रेनमधून येते, त्यामुळे मोहरीचे तेल महाग झाले आहे. परंतु सरकारने आयात खर्च कमी केला असल्यामुळे किंमतीत वाढ दिसून आली नव्हती. दुसरीकडे युक्रेन आणि रशियामधील युध्द अधिक तीव्र झाले आहे. या युध्दामुळे पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा परिणाम मोहरीच्या तेलावरही आपसूकच पडेल. सध्या महिनाभरात त्याचा परिणाम होणार नसला तरी नंतरच्या काही महिन्यांत मोहरीच्या तेलाच्या किमतीतही 20 टक्क्यांनी वाढ शकतात.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT