New Rules From 1st October Dainik Gomantak
अर्थविश्व

1 ऑक्टोबरपासून लागू होणार 'हे' 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम; जाणून घ्या

New Rules From 1st October: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे या वेळीही 1 ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत.

Manish Jadhav

New Rules From 1st October: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे या वेळीही 1 ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत. यातील काही बदल असे आहेत ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. त्यामुळे तुम्हाला या बदलांची आधीच माहिती असणे महत्त्वाचे आहे.

ऑक्टोबरमध्ये होणार्‍या या बदलांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.

दरम्यान, दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद झाली आहे. तुम्ही ती 30 सप्टेंबरपूर्वी बँकेत (Bank) बदलून घ्यावी. 1 ऑक्टोबरपासून तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर तुम्ही ती बदलू शकणार नाही. 30 सप्टेंबर 2023 हा नोटा बदलण्याचा शेवटचा दिवस असेल. यानंतर 2000 रुपयांची नोट बेकायदेशील होईल.

तसेच, एलपीजी (LPG) व्यतिरिक्त सीएनजी-पीएनजीच्या किमतीत तेल कंपन्या बदल करतात. साधारणपणे, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एयर फ्यूलचे (ATF) दर बदलतात. यावेळी सीएनजी-पीएनजीसोबतच एटीएफच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर, परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून परदेश प्रवास महाग होणार आहे. होय, 1 ऑक्टोबरपासून, तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंतच्या टूर पॅकेजसाठी 5 टक्के TCX द्यावा लागेल.

त्याशिवाय 7 लाख रुपयांपेक्षा जास्त टूर पॅकेजसाठी 20 टक्के TCS भरावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या प्रवासाच्या बजेटचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

दुसरीकडे, 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा PPF, पोस्ट ऑफिस बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना आधारशी लिंक करा. तुम्ही असे न केल्यास, 1 ऑक्टोबरपासून तुमचे खाते गोठवले जाऊ शकते.

म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार किंवा गुंतवणूक करु शकणार नाही. त्यामुळे तुमची आर्थिक खाती वेळेत आधारशी लिंक करणे महत्त्वाचे आहे.

शिवाय, ऑक्टोबर महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्टी असेल. या सुट्ट्यांमुळे तुमच्या बँकिंग कामावर परिणाम होईल. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रत्येक शहरात बँका बंद राहतील. याशिवाय, काही प्रादेशिक सुट्ट्याही असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT