Royal Enfield Dainik Gomantak
अर्थविश्व

Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाइक लवकरचं भारतीय बाजारात

TVS, Hero Motocorp, Ather आणि BMW सारख्या दुचाकी उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या इव्ही बाईक लाँच करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

TVS, Hero Motocorp, Ather आणि BMW सारख्या दुचाकी उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या इव्ही बाईक लाँच करणार आहेत. दरम्यान, बुलेट निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड सध्या (Royal Enfield) आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले की, भारतीय बाजारपेठ, उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइक्सची श्रेणी आणि वैशिष्ट्ये यावर चर्चा सुरु आहे. (Royal Enfield's electric bike to hit Indian market soon)

ऑगस्ट 2022 मध्ये, रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दासारी यांनी पुष्टी केली होती की, आयशरच्या मालकीची कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची योजना आखताना दिसत आहे. त्यानंतर कंपनीने 2020-21 च्या वार्षिक अहवालात इलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा उल्लेख देखील केला होता. रॉयल एनफिल्ड ही बाईक 2023 मध्ये कधीही लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने यूकेमध्ये रिसर्चला सुरूवात केली आहे. या बाइकची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून ती पुढील वर्षी लाँच देखील केली जाऊ शकते.

विनोद दासारी यांनी केलेल्या घोषणेनुसार, कंपनीने रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप आधीच तयार केला आहे आणि लवकरच इव्हीचे उत्पादन सुरू केले जाणार आहे. रॉयल एनफिल्डने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक बाइक नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे आणि ती अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज देखील असेल.

इंडिया कार न्यूजच्या अहवालानुसार, बाईक 8 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंतचा बॅटरी पॅक वापरू शकते आणि ती इलेक्ट्रिक मोटरशी जोडली जाणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील सध्याच्या ट्रेंडनुसार, बाइकची पॉवर तसेच पीक टॉर्क सुमारे 40 बीपीएच आणि 100 एनएम असणे अपेक्षित आहे. याच्या डिझाईन आणि फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी बुलेट मॉडेलसारखेच असू शकते अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT