RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI ने घेतला मोठा निर्णय, रविवारीही बँका राहणार सुरु; ग्राहकांचे बल्ले-बल्ले!

Reserve Bank Of India Big Update: रिझर्व्ह बँकेकडून मोठा आदेश जारी करण्यात आला असून, त्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Manish Jadhav

Reserve Bank Of India Big Update: रिझर्व्ह बँकेकडून मोठा आदेश जारी करण्यात आला असून, त्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी 31 मार्च रोजी वार्षिक खाते बंद केल्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँकांना त्यांच्या शाखा वरील तारखेपर्यंत कामाच्या वेळेसाठी खुल्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मंगळवारी सर्व एजन्सी बँकांना लिहिलेल्या पत्रात, आरबीआयने म्हटले आहे की, 2022-23 साठी एजन्सी बँकांनी केलेले सर्व सरकारी व्यवहार त्याच आर्थिक वर्षात जमा केले जावेत.

पत्र जारी केले आहे

सेंट्रल बँकेच्या पत्रात म्हटले आहे की, सर्व एजन्सी बँकांनी 31 मार्च 2023 रोजी सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित ओव्हर द काउंटर व्यवहारांसाठी त्यांच्या नियुक्त शाखा खुल्या ठेवाव्यात.

त्यात पुढे म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरु राहतील.

रिपोर्टिंग विंडो कधी उघडेल

यासोबतच, 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंगचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी RBI चे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल.

RBI ने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, 31 मार्चची रिपोर्टिंग विंडो 1 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत RBI ला GST किंवा TIN 2.0 e-receipts लगेज फाइल अपलोड करण्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या (Government) व्यवहारांच्या अहवालासंदर्भात उघडी ठेवली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT