AC Dainik Gomantak
अर्थविश्व

Repair Ac and Tv Remote: टीव्ही, एसीचा खराब रिमोट काही मिनिटांत असा दुरुस्त करा

Repair Ac and Tv Remote: स्प्रिंग्समध्ये कार्बन जमा होतो किंवा त्याला गंज लागतो.

दैनिक गोमन्तक

Repair Ac and Tv Remote: आपल्या घरात दैनंदीन वापरतील वस्तू अनेकदा बंद पडताना दिसतात. रिमोट कंट्रोलवर असलेल्या वस्तूंचे प्रमाण त्यामध्ये जास्त असलेले पाहायला मिळते.

तुम्ही पाहिले असेल की रिमोट कंट्रोल्स काही महिन्यांच्या वापरानंतर काम करणे थांबवतात, अशा परिस्थितीत लोक त्यांना नवीन रिमोटसह बदलतात आणि त्यांच्यासाठी सुमारे ₹ 200 ते ₹ 400 ची किंमत देखील देतात.

तुमच्या घरातही उपकरणांचे बंद पडलेले रिमोट असतील आणि तुम्ही ही उपकरणे मॅन्युअली कंट्रोल करत असाल, तर हे रिमोट कंट्रोल्स घरीच कसे दुरुस्त करायचे हे जाणून घेणार आहोत. यानंतर तुम्ही तुमचे खराब झालेले रिमोट कंट्रोल्स घरीच दुरुस्त करू शकता.

तुम्हाला तुमच्या कोणत्याही उपकरणाचा खराब झालेला रिमोट पाहिल्यास त्याच्या बॅटरीमध्ये धातूचे स्प्रिंग्स आणि प्लेट्स जोडलेले दिसतात. बर्‍याच वेळा या धातूच्या प्लेट्स आणि स्प्रिंग्समध्ये कार्बन जमा होतो किंवा त्याला गंज लागतो.

धातूच्या भागांमधून गंज आणि कार्बन काढून टाकण्यासाठी आपल्याला सॅंडपेपरच्या तुकड्याने ते स्वच्छ करावे लागेल, कारण यामुळे बॅटरीची शक्ती रिमोटपर्यंत पोहोचत नाही. हे केल्यावर तुमचा रिमोट ठीक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च वाचणार आहे.

IR ब्लास्टर साफ करणे

स्वच्छतेअभावी रिमोट कंट्रोलच्या पुढच्या बाजूला बसवलेल्या आयआर ब्लास्टरवर पुष्कळ धूळ साचत असल्याचे अनेकदा दिसून येते. या धुळीमुळे तुम्ही जेव्हाही रिमोट कंट्रोल वापरता तेव्हा तुमच्या उपकरणापर्यंत सिग्नल पोहोचत नाही. अशावेळी IR ब्लास्टरवर साचलेली घाण स्वच्छ कापडाने स्वच्छ करत केल्यावर रिमोट सुरु होऊन त्यावर चालत असलेली उपकरणेदेखील सुरु होण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT