Redmi Note 14 Pro Plus launching In India Dainik Gomantak
अर्थविश्व

Redmi Note 14 Pro Plus launching: सुपर AI, कॅमेरासह रेडमी नोट 14 प्रो प्लस भारतात होणार लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या

Redmi Note 14 Pro Plus Price In India: नव्याने येणाऱ्या मोबाईलमध्ये एआयची काही खास फिचर्स देण्यात आली आहेत, शिवाय सेन्सर्सचा अल्ट्रावाईड कॅमेरा असेल.

Pramod Yadav

Redmi Note 14 Pro Plus Price, Launch Date In India

रेडमीच्या अपडेटेड सिरिजमधील नवे फोन येत्या ०९ डिसेंबर रोजी भारतात लॉन्च होतायेत. रेडमी नोट १४ सिरिजची अनेकांना उत्सुकता लागली आहे. कंपनी डिसेंबरमध्ये या सिरिजमधीन एडव्हान्स फोन लॉन्च करणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने सुपर कॅमेरा आणि सुपर एआय यासारखी फिचर्स नव्या फोनमध्ये अ‍ॅड केली आहेत.

रेडमी १३ नंतर कंपनीचे रेजमी १४ हे एडव्हान्स वर्जन मार्केमध्ये येण्यासाठी सज्ज झाले आहे. कंपनी येत्या ९ डिसेंबरला रेडमी नोट १४ (Redmi Note 14), रेडमी नोट १४ प्रो (Redmi Note 14 Pro) आणि रेडमी नोट १४ प्रो प्लस (Redmi Note 14 Pro Plus) हे तीन फोन लॉन्च करणार आहे. भारतात लॉन्चनंतर लवकरच सर्वच ऑनलाईन शॉपिंग साईटवर मोबाईल खरेदी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

रेडमी नोट १४ किंमत (Redmi Note 14 Price In India)

भारतात रेडमी नोट १४ ची किंमत २१,९९९ पासून सुरु होणार आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ मेमरी स्टोरेजचा मोबाईल २२,९९९ रुपयांत उपलब्ध होईल. तर ८ जीबी रॅम आणि २५६ मेमरी स्टोरेजचा मोबाईलची किंमत २४,९९९ रुपयांपर्यंत असेल. यामध्ये एआयची काही खास फिचर्स देण्यात आली आहेत, शिवाय सेन्सर्सचा अल्ट्रावाईड कॅमेरा असेल.

रेडमी नोट १४ प्रो किंमत (Redmi Note 14 Pro Price In India)

रेडमी नोट १४ प्रोची किंमत २८,९९९ रुपयांपासून सुरु होईल. ८ जीबी रॅम आणि २५६ मेमरी स्टोरेजचा मोबाईल ३०,९९९ रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये १२ एआयची काही खास फिचर्स असतील.

रेडमी नोट १४ प्रो प्लस किंमत (Redmi Note 14 Pro Plus 5G Price In India)

रेडमी नोट १४ प्रो प्लस ८ जीबी रॅम आणि १२८ मेमरी स्टोरेजच्या मोबाईलसाठी ३४,९९९ रुपये मोजावे लागतील. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ मेमरी स्टोरेजचा मोबाईलसाठी ३६,९९९ रुपये मोजावे लागतील. तसेच, १२ जीबी रॅम आणि ५१२ मेमरी स्टोरेजचा मोबाईल ३९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

फिचर्स काय मिळणार (Redmi Note 14 Pro Plus 5G Features And Specifications)

मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन ७एस जेनरेशन ३ प्रोसेसर (Snapdragon 7s Gen 3 chipset) वापरण्यात आला आहे. मोबाईलचा डिस्पले ६.६७ इंच अमोलेड असेल. याशिवाय मोबाईलमध्ये कॅमेरा, म्युझिकसाठी एडव्हान्स फिचर्स देण्यात आलीयेत. फोनला ६,२०० मेगा अ‍ॅम्पीयर बॅटरी असेल सोबत ९० वॅटचा चार्चर मिळणार आहे. फिंगरलॉकची सुविधा देण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT