Amazon Dainik Gomantak
अर्थविश्व

Amazon Lay Off: भारतापर्यंत मंदीच्या झळा, देशातील 1000 कर्मचाऱ्यांना Amazon देणार नारळ!

Amazon: जागतिक मंदीबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, जगभरातून टाळेबंदीच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या आहेत

दैनिक गोमन्तक

Amazon Lay Off: जागतिक मंदीबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, जगभरातून टाळेबंदीच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या आहेत. यातच आता ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना आखली आहे. कंपनी मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

भारतातील 1 लाख कर्मचारी

जगभरातील 18,000 नोकऱ्या काढून टाकण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे भारतातील (India) सुमारे 1,000 कर्मचारी प्रभावित होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. आणखी एका सूत्राने सांगितले की, अ‍ॅमेझॉनचे (Amazon) भारतात एक लाख कर्मचारी आहेत. येथील एक टक्का कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. मात्र, याबाबत विचारले असता अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

जागतिक टाळेबंदी

खरेतर, अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे Amazon जगभरातील 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. अलीकडेच Amazon CEO अँडी जेस्सी यांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले होते. यामध्ये त्यांनी जागतिक स्तरावर 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या कंपनीच्या निर्णयाची माहिती दिली होती.

जेस्सी यांच्या निवेदनानुसार, आम्ही सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहोत. या निर्णयाचा फटका अनेकांना बसणार आहे. तथापि, बहुतेक पोस्ट Amazon Store आणि PXT (People, Experience and Tech) संस्थेशी संबंधित आहेत.'' तसेच, 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 16,08,000 पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी आहेत, जे Amazon मध्ये काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

Taliban New Penal Code: बायकोला हाडं तुटेपर्यंत मारणं आता 'कायदेशीर', तालिबानचा नवा क्रूर कायदा; अफगाणिस्तानात पुन्हा महिलांच्या हक्कांची पायमल्ली

Ranji Trophy: जम्मू-काश्मीर संघाचा ऐतिहासिक विजय, बंगालवर मात करून पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT