Realme C73 5G Dainik Gomantak
अर्थविश्व

Realme C73 5G: पॉवरफुल फीचर्स, स्टायलिश लूक आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह 'रिअलमी'चा नवा स्मार्टफोन लॉन्च; किंमत माहितीये?

Realme C73 5G स्मार्टफोन 6000mAh मोठी बॅटरी, मिलिटरी-ग्रेड स्ट्रेंथ आणि 32MP रियर कॅमेरा सारख्या वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आला आहे. जाणून घेऊया मोबाईलबाबत सर्व माहिती.

Sameer Amunekar

Realme ने भारतात आपल्या C-सिरीज अंतर्गत एक नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Realme C73 5G हा कंपनीचा अत्याधुनिक व परवडणारा हँडसेट असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. याआधी कंपनीने मागील महिन्यात Realme C75 बाजारात आणला होता आणि आता C73 5G लाँच करून बजेट सेगमेंटमध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

Realme C73 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, आणि 32MP प्रायमरी रिअर कॅमेरा हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स दिले गेले आहेत. या फोनमध्ये 8GB डायनॅमिक RAM सह 4GB इनबिल्ट RAM उपलब्ध आहे, जे वापरकर्त्यांसाठी मल्टीटास्किंगचा एक चांगला अनुभव मिळणार आहे.

Realme C73 5G ची किंमत

Realme C73 5G चे दोन व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत. 4GB RAM + 64GB स्टोरेज 10,499 रूपये आणि 4GB RAM + 128GB स्टोरेज -11,499 रूपयांना खरेदी करता येणार.

फोन जेड ग्रीन, क्रिस्टल पर्पल आणि ओनिक्स ब्लॅक या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन Realme च्या अधिकृत वेबसाइटवर, Flipkart वर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे.लाँच ऑफर अंतर्गत ग्राहकांना सर्व बँकांच्या क्रेडिट कार्ड EMI वर 500 रूपयांची सवलत देखील मिळू शकते.

ealme C73 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: 6.67-इंच HD+ (720×1604 पिक्सेल) IPS LCD स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 6300 (6nm), Mali-G57 MC2 GPU

  • RAM आणि स्टोरेज: 4GB RAM, 64GB/128GB स्टोरेज, 2TB पर्यंत मायक्रोएसडी सपोर्ट

  • ऑपरेटिंग सिस्टिम: Android 16 आधारित realme UI 6.0

कॅमेरा

  • मागील कॅमेरा: 32MP प्रायमरी कॅमेरा (f/1.8), LED फ्लॅश

  • सेल्फी कॅमेरा: 8MP फ्रंट कॅमेरा (f/2.0)

Realme C73 5G हा स्मार्टफोन खास करून त्याच्या दमदार बॅटरी, 5G कनेक्टिव्हिटी, प्रीमियम डिझाइन आणि बजेट किमतीत खरेदी करता येणार आहे. अँड्रॉइड 16 सह हा हँडसेट आपल्या किंमत वर्गात एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स पाहणाऱ्या ग्राहकांसाठी Realme C73 5G एक फायदेशीर डील ठरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

Online Food Ordering Platforms: Zomato, Swiggy वरून जेवण ऑर्डर करणं महाग, कोणतं प्लॅटफॉर्म देतंय स्वस्त डिलिव्हरी सेवा? जाणून घ्या

Zimbabwe vs Sri Lanka: सिकंदर रजाचा 'डबल धमाका'! श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत केली मोठी कामगिरी; SKY आणि सेहवागला सोडले मागे

Viral Video: मेट्रोतील 'इन्स्टा' वेड! 'बॅटमॅन' बनून रिल करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'एवढी ताकद अभ्यासात लावली असती तर...'

Japan PM Resign: जपानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची राजीनाम्याची घोषणा, कारण काय?

SCROLL FOR NEXT