RBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Penalty On Banks: RBI ची 8 बँकांवर मोठी कारवाई, लाखोंचा ठोठावला दंड

RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आठ सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमन्तक

RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आठ सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयकडून निवेदन जारी करुन 8 बँकांना दंड ठोठावला असल्याचे सांगण्यात आले आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक 55 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या बँकांना 10-10 लाखांचा दंड ठोठावला

याशिवाय, रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँक कैलाशपुरमवर,10 लाख रुपये, केरळमधील (Kerala) ओट्टापलम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडवर 5 लाख रुपये तर हैदराबादस्थित, दारुस्सलम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या बँकांनीही नियमांकडे दुर्लक्ष केले

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, नेल्लोर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. गांधीनगर, काकीनाडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लि. काकीनाडा यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रपाडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, केंद्रपाडा यांना 1 लाख रुपये, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रतापगड, उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बँकेला दंड का ठोठावला

विशाखापट्टणम को-ऑपरेटिव्ह बँक, विशाखापट्टणमवर हा दंड गृहनिर्माण योजनांसाठी उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, तरतूद आणि वित्त संबंधित निर्देशांचे उल्लंघन न केल्याबद्दल ठोठावण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात बँकांच्या निष्काळजीपणामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. अशा परिस्थितीत, बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Leopard: रात्री 11 वाजता कुत्र्याला पळवले, शिगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांची उडाली झोप

Mandovi Bridge Accident: मांडवी पुलाजवळ भीषण अपघात! कारला दुचाकी धडकल्या; दोन्ही चालक गंभीर जखमी

Marathi Language: '..पेटून उठण्याची वेळ आली आहे', वेलिंगकरांचा निर्धार; मराठीला संपवण्याचे षडयंत्र सुरू असल्याची भीती व्यक्त

Loliem: फिल्‍म सिटी, युनिटी मॉल नकोच! ग्रामसभा तापल्‍या; लोलयेवासीयांचा तिसऱ्या जिल्‍ह्यासह 13 प्रकल्‍पांना विरोध

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT