RBI fines 1 crore rupees to UNION bank of India  Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI चा आणखी एका सरकारी बँकेला 1 कोटींचा दंड

RBI च्या मते, बँकांनी तणावग्रस्त मालमत्तेच्या विक्रीवरील मार्गदर्शक तत्त्वे उल्लंघन केले आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आणखी एका सरकारी बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. RBI ने युनियन बँक ऑफ इंडियाला (Union Bank) एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.(RBI fines 1 crore rupees to UNION bank of India)

RBI च्या मते, युनियन बँक ऑफ इंडियाने "बँकांकडून तणावग्रस्त मालमत्तेच्या विक्रीवरील मार्गदर्शक तत्त्वे उल्लंघन केले आहे. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर 1 कोटी रुपये तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता . SBI च्या ग्राहकाच्या खात्याच्या तपासणीत असे आढळून आले की बँकेने त्या खात्यातील फसवणुकीची माहिती देण्यास विलंब केला आहे.

याप्रकरणी आरबीआयने एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेकडून अहवालाला उत्तर मिळाल्यानंतर, आरबीआयने एसबीआयला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याबाबत एका निवेदनात, RBI ने म्हटले आहे की SBI ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानिर्देश, 2016 मधील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT