Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: मोदी सरकारचा रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! देशभरात लागू झाला नवा नियम लागू

Ration Card Latest Update: जनतेच्या सोयीसाठी सरकार नवनवीन नियम आणत आहे. यातच, रेशनाकार्डधारकांसाठी एक खूशखबर आहे.

Manish Jadhav

Ration Card Latest Update: जनतेच्या सोयीसाठी सरकार नवनवीन नियम आणत आहे. यातच, रेशनाकार्डधारकांसाठी एक खूशखबर आहे.

मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी 'वन नेशन वन रेशन कार्ड योजना' संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून, त्यानंतर सर्व दुकानांमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) डिवाइस अनिवार्य करण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आता दिसू लागला आहे.

रेशन वितरणात गडबड होणार नाही

वास्तविक, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत, केंद्र सरकारने (Central Government) रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (EPOS) डिवाइस इलेक्ट्रॉनिक स्केलशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात रेशनचा लाभ मिळू शकेल. कायद्याने नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

देशभरात नवीन नियम लागू

आता, देशातील सर्व रास्त धान्य दुकाने ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) डिवाइसशी जोडली गेली आहेत. म्हणजेच आता रेशनच्या वजनात त्रुटी राहण्यास वाव नाही.

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत कमी रेशन मिळू नये याची खात्री करण्यासाठी, रेशन डीलर्संना हायब्रीड मॉडेल पॉइंट ऑफ सेल मशीन देण्यात आल्या आहेत.

नेटवर्क नसल्यास ही मशीन ऑफलाइन तसेच ऑनलाइन मोडमध्येही काम करतील. आता लाभार्थी त्यांचे डिजिटल रेशन कार्ड (Ration Card) वापरुन राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील कोणत्याही रास्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करु शकतील.

नियम काय आहे?

सरकारचे म्हणणे आहे की, ही सुधारणा म्हणजे NFSA अंतर्गत लक्ष्य सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) च्या ऑपरेशनची पारदर्शकता सुधारुन कायद्याच्या कलम 12 अंतर्गत अन्नधान्याचे वजन सुधारण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (NFSA) अंतर्गत, सरकार देशातील सुमारे 80 कोटी लोकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो गहू आणि तांदूळ (अन्नधान्य) अनुक्रमे 2-3 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने देत आहे.

काय बदलले आहे?

सरकारने म्हटले आहे की, राज्यांना EPOS डिवाइस योग्यरित्या चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रति क्विंटल रु. 17.00 च्या अतिरिक्त नफ्यातून बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी, अन्न सुरक्षा (राज्य सरकारांना सहाय्य) नियम 2015 चे उप-नियम (2) आहे. नियम 7 मध्ये सुधारणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT