Ration Card Holder Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: रेशनकार्डधारकांना लागली लॉटरी, आता फ्री रेशनसह मिळणार पैसे; खात्यात येणार एवढे रुपये!

Ration Card Update: आता सरकार रेशनकार्डधारकांना पैसे हस्तांतरित करेल, परंतु त्याचा लाभ काही ठरावीक रेशनकार्डधारकांनाच मिळणार आहे.

Manish Jadhav

Ration Card Update: रेशनकार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही रेशनकार्डधारक असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून मोफत रेशन आणि पैसेही मिळणार आहेत.

होय... केंद्र आणि राज्य सरकारकडून कार्डधारकांना वेळोवेळी अनेक सुविधा दिल्या जातात. आता सरकार रेशनकार्डधारकांना पैसे हस्तांतरित करेल, परंतु त्याचा लाभ काही ठरावीक रेशनकार्डधारकांनाच मिळणार आहे.

मोहरीचे तेल पूर्वी मोफत मिळत होते

केंद्रासोबतच राज्य सरकारकडून (Government) रेशनकार्डधारकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. अलीकडेच हरियाणा सरकारने बीपीएल कार्डधारक आणि अंत्योदय कार्डधारकांना (AAY) दोन लिटर मोहरीचे तेल मोफत देण्याची घोषणा केली.

यापूर्वी सरकार 250 रुपये वर्ग करत होते.

याशिवाय, जून 2021 मध्ये तेलाच्या किमती वाढल्याने सरकारने तेल वितरण बंद करुन कार्डधारकांना दरमहा 250 रुपये देण्याची घोषणा केली होती. सध्या राज्य सरकार आता ही रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे.

सरकार किती पैसे वाढवू शकते

सरकार आता हे 250 रुपये वाढवण्याचा विचार करत आहे. ही रक्कम वाढवण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. त्यात 250 ते 300 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

राज्य सरकारच्या या बदलाचा लाभ बीपीएल आणि एएवाय रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. सुमारे 32 लाख कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे.

2023 मध्ये मोफत रेशन मिळेल

त्याचबरोबर, कार्डधारकांना केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेंतर्गत मोफत गहू आणि तांदूळ देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

2023 मध्येही केंद्र सरकारने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला वर्षभर रेशनसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री उसगावात दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT